चाफळ :
ज्येष्ठ पत्रकार बा. मा. सुतार यांचे चिरंजीव धनंजय सुतार यांची विश्वस्तांच्या बैठकीत १ एप्रिल २०२१पासून श्रीराम देवस्थान ट्रस्टच्या व्यवस्थापकपदी निवड करण्यात आली. धनंजय सुतार यांनी आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारून कामकाजास प्रारंभ केला आहे.
धनंजय सुतार हे संगणकतज्ज्ञ असून, त्यांनी आफ्रिकेत एका कंपनीत मॅनेजर पदावर काम केले आहे. त्यांचे निवडीबद्दल ट्रस्टचे अध्यक्ष सुभाषराव जोशी, कार्यकारी विश्वस्त अमरसिंह पाटणकर, अरुण गोडबोले, मानसी माचवे, मानसी पत्की, एल. एस. बाबर, योगेशबुवा रामदासी, बाळासाहेब स्वामी, प्रसाद स्वामी, भूषण स्वामी, गिरीष सोहनी, बा. मा. सुतार, अनिल साळुंखे, ॲड. शिरीष पेंढरकर, डॉ. सुभाष एरम, समीर जोशी, दिलीप गुरव, डी. एम. सुतार, महेश सुतार, पत्रकार उमेश सुतार, ॲड. योगेश पेंढरकर यांनी अभिनंदन केले.