शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
3
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
4
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
5
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
6
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
7
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
8
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
9
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
10
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
11
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
12
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
13
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
14
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
15
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
16
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
17
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
18
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
19
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
20
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील

शिवसह्याद्री पायदळाची ऐतिहासिक झेप; भारावली तरुणाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2020 23:31 IST

खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने सिंहगड ते रायगड असा अनोखा पायी प्रवास ट्रेकिंगचे नियोजन बांधकाम अभियंता श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यामध्ये ४० शिलेदार सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी आतकरवाडी मार्गे सिंहगड चढाई करून कल्याण दरवाजाने विंझर

ठळक मुद्देसिंहगड ते रायगड दरम्यानच्या रानवाटा पादाक्रांत चाळीस मावळे सहभागी :

खंडाळा : छत्रपती शिवाजी महाराजांचे स्वराज्य सह्याद्रीच्या डोंगररांगातील कडेकपारी, घनदाट अरण्य आणि बळकट गड किल्ल्यातून विस्तारले. शिवरायांचा हाच ठेवा प्रत्यक्ष पाहण्याचा ध्यास घेऊन इतिहासाचा वारसा जपण्यासाठी खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने ऐतिहासिक झेप घेतली. सिंहगड-राजगड-तोरणा-बोराट्याची नाळ-रायगड असा तब्बल ८२ किलोमीटरच्या रानवाटा तीन दिवसांत पादाक्रांत करीत स्वच्छता मोहीम राबविली.

खंडाळा येथील शिवसह्याद्री पायदळ ट्रेकर्सने सिंहगड ते रायगड असा अनोखा पायी प्रवास ट्रेकिंगचे नियोजन बांधकाम अभियंता श्रीपाद जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली केले. यामध्ये ४० शिलेदार सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी आतकरवाडी मार्गे सिंहगड चढाई करून कल्याण दरवाजाने विंझर गावाकडे उतरले. विंझर ते गुंजवणी पायी प्रवास व पुढे राजगड चढाई करून संजीवनी माचीवरून पालखिंडीत उतरून ३२ किलोमीटरच्या अथक प्रवासानंतर मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पाल खिंड ते बुधला माचीवरून तोरणा किल्ला व पुढे कानंद खिंडीत उतरून गेळवणी मार्गे मोहरी गावात सुमारे २६ किलोमीटरचा प्रवास करून मुक्काम करण्यात आला.

तिस-या दिवशी मोहरी ते रायलिंग पठार, बोराट्याची नाळ, लिंगाणा किल्ल्याला वळसा घालून पाणेगाव दरीतून उतरून पुढे रायगडवाडी मार्गे रायगड किल्ला चढाई केली. त्यानंतर चित्त दरवाजाने खाली येणे हा सुमारे २४ किलोमीटरचा प्रवास अतिशय दिमतीने पूर्ण केला .

तीन दिवसांच्या क्षमतेपेक्षा अधिकचे अंतर असल्याने अंतिम टप्प्यात काहींच्या पायांना फोड तर गुडघ्यांना चमक असताना छत्रपती शिवरायांच्या समाधी दर्शनाची आस बाळगून मोठ्या जिद्दीने हा ट्रेक सदस्यांनी पूर्ण केला. त्यानंतरही स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

ध्यास स्वच्छतेचा .....गडकोट ट्रेकिंगमधून प्रत्येक गडावर या ग्रुपच्या माध्यमातून सफाई मोहीम राबवली जाते. गडावरील पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिक कचरा व इतर कचरा जमा करून तो मोठ्या पिशव्यातून भरून गडाखाली आणला. त्याची योग्य निचरा केला जातो. त्यामुळे स्वच्छतेचा ध्यास घेऊन केलेल्या कामामुळे किल्ल्यांची स्वच्छता राखण्यास मदत होते. 

छत्रपती शिवरायांच्या पराक्रमी इतिहासाची जाणीव मनामध्ये राहावी तसेच गडकिल्ल्यांची स्वच्छता राहावी, यासाठी ट्रेकिंग मोहिमेचे आयोजन केले जाते. याबरोबर शारीरिक स्थिती मजबूत राहण्यास मदत होते. याशिवाय रोजच्या धावपळीतून वेगळं काही केल्याचा आनंदही मिळतो.- श्रीपाद जाधव, संस्थापक शिवसह्याद्र्री पायदळ ट्रेकर्स

 

टॅग्स :Trekkingट्रेकिंगsinhagad fortसिंहगड किल्ला