शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शहीद जवानाच्या कुटुंबीयांची वणवण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 04:36 IST

सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे.

मुंबई : सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे. सरकार दरबारी मात्र शहीद जवानांच्या कुटुंबीयांवर मदत निधीची रक्कम मिळवताना वणवण होत आहे.सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील मस्करवाडी, कुकडवाड येथील सुनील विठ्ठल सूर्यवंशी हे २०१०मध्ये सैन्यात दाखल झाले. सियाचीनमधील बर्फाळ प्रदेशात १० फेब्रुवारी २०१६ रोजी बर्फाचा कडा कोसळून दहा जवानांनी वीरमरण पत्करले. सियाचीनचा प्रदेश अत्यंत दुर्गम आणि मानवी क्षमतेची कसोटी घेणारा असतो. या घटनेत मस्करवाडीचे सुनील सूर्यवंशीही शहीद झाले. देशसेवा करताना शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना राज्य शासनातर्फे साडेआठ लाखांची मदत केली जाते.सैनिक कल्याण खातेसंभाजीराव निलंगेकर-पाटील मंत्री असलेले सैनिक कल्याण खाते राज्यात कमालीचे सुस्त बनलेले आहे. वास्तविक, राज्य सरकारांकडून शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांना दिली जाणारी मदत केंद्राकडून राज्याला परत मिळते. असे असूनही सैनिकांच्या कुटुंबीयांकडे कमालीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे राज्यातील समस्त जवानांच्या कुटुंबीयांमध्ये राज्य सरकारबद्दल नाराजीची भावना आहे.मुख्यमंत्र्यांची ‘ती’ माहितीवरळीत ३१ जानेवारी रोजी ‘वन फॉर आॅल, आॅल फॉर वन’ या जवानांच्या सन्मानार्थ झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘पूर्वी सरकारकडून साडेआठ लाख रुपये दिले जायचे, आम्ही २० लाख देतोय, यापुढे २५ लाख देऊ’ अशी महत्त्वपूर्ण घोषणा केली होती.

टॅग्स :Indian Armyभारतीय लष्करSatara areaसातारा परिसर