शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
2
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
3
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
4
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
5
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
6
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
7
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
8
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
9
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
10
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
11
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
12
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
13
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
14
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
15
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
16
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
17
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
18
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
19
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
20
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?

देसाई-पाटणकर गटांत लढत!

By admin | Updated: June 25, 2015 22:46 IST

पाटण तालुका : ९५ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक ,माण तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींची निवडणूक

पाटण : तालुक्यातील तब्बल ९५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी ४ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी १३ जुलैपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. आता पासूनच गावागावांमध्ये रात्रबैठका, गटातटाची चाचपणी आणि सरपंच कोणाला करायचं, याचे आखाडे बांधण्यास सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी पाटण तालुक्यातील आजी-माजी आमदारांचे सल्ले घेण्यासाठी नेत्यांच्या निवासस्थानी गावातील पुढारी जाऊ लागले आहेत.पाटण तालुक्यातील आडदेव, वजरोशी, असवलेवाडी, नाडोली, आटोली, वाझोली, बोडकेवाडी, नावडी, धावडे, काठणे, नेरळ, गोषटवाडी, टेळेवाडी, चाफोली, पापर्डे खुर्द, जरेवाडी, वांझोळे, चव्हाणवाडी, पवारवाडी, काहीर, बाचोली, चिटेघर, सळवे, कातवडी, चोपडी, सातर, पिंपळगाव, धामणी, दिवशी खुर्द, शिंदेवाडी, खळे, गोकुळ तर्फ पाटण, हावळेवाडी, सोनाईचीवाडी, कोचरेवाडी, करपेवाडी, हुंबरळी, सोनवडे, कोळेकरवाडी, कसणी, जानुगडेवाडी, सुळेवाडी, मणदुरे, कवडेवाडी, काळगाव, तारळे, मुंद्रुळहवेली, खोनोली, काळोशी, त्रिपुडी, मस्करवाडी, मानेवाडी, कामरगाव, उमरकांचन, मुरुड, निगडे, कोळोलीवाडी, कोतावडे, नावेल, पाळशी, खिवशी, सांगवड, पाचगणी, पिंपळोशी, कोकिसरे, चिखलेवाडी, पाठवडे, सुपुगडेवाडी, कोरावळे, चोपदारवाडी, पेठ शिवापूर, तामिणे, कुंभारगाव, दिवशी बुद्रुक, शिंद्रुकवाडी, तामकडे, कुठरे, टोळेवाडी, सुरूल, ठोमसे, नालोशी, बांबवडे, विरेवाडी, आंबवणे, मेंढोशी, घाटोळे, वाघजाईवाडी, आंबळे, मुळगाव अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका ४ आॅगस्ट रोजी होत आहेत. पाटण तालुक्यात इतर निवडणुकांपेक्षा ग्रामपंचायती निवडणुकीला महत्त्व दिले जाते. विद्यमान आमदार शंभूराज देसाई व माजी आमदार विक्रमसिंह पाटणकर यांचे पूत्र सत्यजित पाटणकर यांच्यात विधानसभेला लढत झाली. त्यामध्ये १८,८२४ मताच्या फरकांनी आमदार देसाई विजयी झाले होते. त्यानंतर ग्रामपंचायतीची निवडणूक होत आहे. (प्रतिनिधी)शेताच्या बांधावर रंगणार गावगप्पा...पाटण तालुक्यात पावसाळा म्हटलं की खरीप हंगामाचे दिवस असतात. या काळात सर्व शेतकरी आपल्या कुटुंबासह शेतात राबतात. त्यातच गावातील निवडणुका लागल्याने गाव पुढाऱ्यांच्या गप्पा या शेतातील बांधावर रंगणार आहेत. त्यामुळे आगामी दोन महिने पाटण तालुक्यात राजकीय गप्पांना अधिक जोर येणार आहे. माण तालुक्यात ५७ ग्रामपंचायतींची निवडणूकम्हसवड : माण तालुक्यात जिल्हा बँक निवडणुकीने तापलेले वातावरण थंड होते ना होते तोच तालुक्यातील १०६ ग्रामपंचायतींपैकी ५७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच राष्ट्रीय समाज पक्ष, भाजपा, शिवसेना हे महायुतीतील घटक पक्ष युती करून निवडणुकीस सामोरे जाणार का? वेगवेगळे लढणार? यावर तिरंगी का बहुरंगी लढती होणार हे अवलंबून आहे. माण तालुक्यातील ५७ ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम नुकताच जाहीर झाला आहे. यामधील राजकीयदृष्ट्या संवदेनशील असणाऱ्या दहिवडी, गोंदवले बु, गोंदवले खु, मार्डी, जांभुळणी, कुकुडवाड, लोधवडे, वरकुटे-म्हसवड, शेनवडी, वडजल, काळचौंडी, पिंपरी, पिंगळी बु।।, पळसावडे या ग्रामपंचायतींसह भालवडी, शिंदी खुर्द, गटेवाडी, पर्यंती, भाटकी, शिरवली, शेवरी, पुकळेवाडी, बोडके, स्वरूपखानवाडी, राजवडी, डंगिरेवाडी, तोंडले, हवालदारवाडी, राणंद, दिवडी, वडगाव, हिंगणी, शंभुखेड, शिंदी बुदु्रक, हस्तनपूर, वाघमोडेवाडी, सोकासन, जाशी, वाकी, खडकी, श्रीपालवन, कारखेल, बोथे, टाकेवाडी, किरकसाल, कुळकजाई, थदाळे, मोगराळे, भांडवली, वळई, मोही, ढाकणी, येळेवाडी, पिंगळी खुर्द, धामणी, पानवण, गंगोती या ग्रामपंचायतींच्या पंचवार्षिक निवडणुका होणार आहेत.तालुक्यातील निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेल्या ग्रामपंचायतींवर आमदार जयकुमार गोरे, पंचायत समिती सदस्य शेखर गोरे, माजी आमदार सदाशिवराव पोळ गटाच्या विचारांची सत्ता आहे. सद्य:स्थितीत दोन्ही गोरे बंधूंच्या भोवतीच तालुक्याचे राजकारण फिरताना दिसून येत आहे. (प्रतिनिधी)