शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

फलटणमधील गर्भलिंग निदानमध्ये आरोग्य उपसंचालकांचे कारवाइचे आदेश, ‘तो’ डाॅक्टर पसार

By दत्ता यादव | Updated: December 16, 2023 19:08 IST

सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे उसाच्या फडात अवैधरीत्या होत असलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाची पुणे येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी दखल ...

सातारा : फलटण तालुक्यातील पिंप्रद येथे उसाच्या फडात अवैधरीत्या होत असलेल्या गर्भलिंग निदान प्रकरणाची पुणे येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनी दखल घेतली आहे. या प्रकरणात तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत.पिंप्रदमधील शिंदे वस्तीवरील उसाच्या फडात गर्भलिंग निदान केले जात होते. ‘लोकमत’ने स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर ही माहिती समाजासमोर आली. गेल्या चार दिवसांपासून आरोग्य विभागाकडून विविध पातळीवर या प्रकरणाची कसून चाैकशी सुरू आहे. त्यातच आता पुणे येथील आरोग्य उपसंचालक डाॅ. राधाकिशन पवार यांनीही या प्रकरणात लक्ष घातले आहे. त्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांना या प्रकरणात विलंब न करता तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. संशयितांनी केलेला हा प्रकार गंभीर स्वरूपाचा आहे. त्यामुळे संबंधितांची चाैकशी करून तत्काळ कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. त्या अनुषंगाने आता जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. युवराज करपे यांनीही या प्रकरणात कारवाईसाठी हालचाली सुरू केल्या आहेत.

‘तो’ डाॅक्टर पसारआरोग्य विभागाच्या पथकाने घटनास्थळी जाऊन तपासणी केली असता संबंधित डाॅक्टर तेथून पसार झाल्याचे समोर आले. आजूबाजूच्या लोकांकडेही पथकाने चाैकशी केली. त्यावेळी फलटण परिसरातील अनेक लोकांनी आरोग्य विभागाच्या पथकाला सविस्तर माहिती दिल्याचे समजते. तो डाॅक्टर कोण आहे. याचीही माहिती दिली असून, त्या डाॅक्टरांकडून त्या ठिकाणी अवैधरीत्या गर्भलिंग निदान चाचणी केली जात होती, अशी माहिती नागरिकांनी दिल्याचे खात्रीशीर समजते. 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरphaltan-acफलटणdoctorडॉक्टर