शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Satara- घडतंय बिघडतंय: महाराष्ट्र केसरी, हिंद केसरींचे कराड दक्षिणेतील पैलवानांवर लक्ष!

By प्रमोद सुकरे | Updated: June 16, 2025 11:24 IST

आता कोणत्या पैलवानासाठी ते कोणता डाव टाकणार?

प्रमोद सुकरे कऱ्हाड: डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील व हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ यांनी नुकतेच शिंदेसेनेचे 'धनुष्यबाण' हातात घेतले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तर राज्यात पैलवानांचे संघटन वाढवण्याची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिल्याचे खात्रीशीर समजते. त्यामुळे पक्ष वाढीसाठी या दोघांचे प्रयत्न सुरू असून कराड दक्षिण मधील अनेक पैलवानांवर त्यांचे आता लक्ष आहे. नजीकच्या काळात काही पैलवानांनी त्यांच्याप्रमाणेच हातामध्ये 'धनुष्यबाण' घेतला तर आश्चर्य वाटायला नको.

दिवंगत यशवंतराव चव्हाण यांची कर्मभूमी असलेला कराड तालुका राजकीय दृष्ट्या संवेदनशील म्हणून ओळखला जातो. तर लाल मातीतील कुस्ती आणि कराडचेही वेगळे नाते आहे. देशाला कुस्तीतील पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणारे पैलवान खाशाबा जाधव याच मातीतले तर महाराष्ट्र केसरी म्हणून फड मारणारे पैलवान संजय पाटील याच मातीतले. या मातीने अनेक चांगले मल्ल आजवर महाराष्ट्राला दिले आहेत. तर येथील अनेक पैलवान कुस्ती संघटक म्हणून कार्यरत आहेत. कराड तालुक्यात अनेक मल्ल प्रशिक्षण केंद्रे आहेत. तर गोळेश्वर येथे दिवंगत खाशाबा जाधव यांच्या गावात आता आंतरराष्ट्रीय दर्जाचे कुस्ती संकुल प्रस्तावित आहे.

कुस्तीच्या आखाड्यात रमणारे पैलवान राजकारणाच्या आखाड्यातही तितकेच रमतात हा इतिहास आहे. कराड तालुकाही त्याला अपवाद नाही. आजवर अनेक पैलवानांनी येथील राजकारणामध्ये आपला करिष्मा दाखवून दिला आहे. तर सध्या अनेक पैलवान राजकारणामध्ये सक्रिय आहेत. आता यातीलच काही पैलवान आपल्या सोबत येतील का? याचीच चाचपणी सध्या चंद्रहार पाटील व संतोष वेताळ करीत असल्याचे खात्रीशीर समजते.

कराड तालुका हा सातारा जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका आहे. त्यामुळे येथे कराड दक्षिण व उत्तर असे विधानसभेचे २ मतदारसंघ आहेत. यातील उत्तरेतील हिंदकेसरी पैलवान संतोष वेताळ चंद्रहार पाटलांच्या बरोबर शिंदेसेनेत गेलेच आहेत. आता त्या दोघांनी मिळून आपला मोर्चा कराड दक्षिणेकडे वळवला आहे. त्यांच्यासोबत कोल्हापूरच्या तालमीत असणाऱ्या अनेक पैलवानांच्या ते संपर्कात आहेत. आता कोणत्या पैलवानासाठी ते कोणता डाव टाकणार हे पाहण्यासाठी थोडे थांबावे लागेल.

चंद्रहार पाटलांचे कराडशी घनिष्ठ संबंधडबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील व कराड तालुक्याचे जवळचे आणि घनिष्ठ संबंध आहेत. महाराष्ट्र केसरी पैलवान संजय पाटील व त्यांच्यात गुरु शिष्याचे नाते होते. तर चंद्रहार पाटील यांची सासुरवाडी देखील कराड तालुक्यातील वडगाव हवेली आहे बरं!

महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील व हिंदकेसरी संतोष वेताळ यांच्याशी आमचे पूर्वीपासूनच एक पैलवान म्हणून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यांनी आता शिंदेसेनेत प्रवेश केला आहे. मी देखील त्यांच्यासोबत यावे यासाठी ते माझ्या संपर्कात आहेत. - पैलवान नाना पाटील (काले), सरचिटणीस, सातारा जिल्हा काँग्रेस