शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
2
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
3
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
4
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
5
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
6
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
7
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
8
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
9
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
10
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
11
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
12
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
13
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
14
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
15
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
16
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
17
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
18
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
19
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
20
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा

साताऱ्यात दोन्ही पवार एकत्र; पण मनोमिलनासाठी ‘वेट ॲड वॉच’

By हणमंत पाटील | Updated: May 10, 2025 17:13 IST

हणमंत पाटील सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या विधानाने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली; ...

हणमंत पाटीलसातारा : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या राष्ट्रवादी एकत्रीकरणाच्या विधानाने कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढली; पण साताऱ्यातील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवारशरद पवार एकत्र आले; पण दोन्ही नेत्यांनी एकमेकांशी संवाद न करता बगल दिली. त्यामुळे राष्ट्रवादीतील दोन्ही पवार यांच्या मनोमिलनासाठी कार्यकर्त्यांना ‘वेट ॲड वॉच’ करावा लागणार आहे.आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विशेषत: मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धवसेना व मनसे एकत्र येण्याची चर्चा जोरात सुरू झाली. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही अटीवर त्यासाठी संमती दर्शविली. ठाकरे बंधू एकत्रीकरणाच्या चर्चाला शरद पवार यांच्या पुण्यातील विधानाने कलाटणी मिळाली. ‘राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास आम्हाला आनंदच वाटेल,’ असे सूचक विधान करीत शरद पवार यांनी या एकत्रीकरणाचा चेंडू अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या कोर्टात टाकला. त्यामुळे सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने दोन्ही पवार गुरुवारी एकत्र आल्याने कार्यकर्त्यांना उत्सुकता होती.दरम्यान, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ९ मे रोजी पुण्यतिथीच्या निमित्ताने साताऱ्यात झालेल्या कार्यक्रमाला एक दिवस अगोदर शरद पवार हे साताऱ्यात दाखल झाले. यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब सोळसकर यांनी त्यांचे विश्रामगृह येथे गुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांतील नेते व कार्यकर्ते एकाच विचाराचे असल्याने ते साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमानिमित्ताने शुक्रवारी एकत्र आले. खासदार धैर्यशील मोहिते- पाटील, माजी मंत्री जयंत पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील, चेतन तुपे, आमदार शशिकांत शिंदे असे दोन्ही गटांतील नेते व पदाधिकारी एकत्र आले. यावेळी अजित पवार गटाचे मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील व खासदार सुळे यांनी एकमेकांशी चर्चा केली. तसेच दोन्ही गटांतील दुसऱ्या फळीतील नेते व कार्यकर्त्यांमध्ये कार्यक्रमाच्या निमित्ताने मनोमिलन दिसून आले. मात्र, शरद पवार, अजित पवार व सुप्रिया सुळे हे एका व्यासपीठावर असूनही त्यांनी एकमेकांना टाळण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून आले. त्यामुळे कार्यकर्त्यांच्या उत्सुकतेवर पाणी पडले. आता राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणासाठी पवार कुटुंबाचे मनोमिलन गरजेचे असल्याचे कार्यकर्त्यांच्या लक्षात आले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPoliticsराजकारणSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवार