शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र येणार?; शरद पवारांचं सर्वात मोठं विधान, राजकीय वर्तुळात उधाण
2
Masood Azhar News: 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अजहरच्या कुटुंबातील कोण मारले गेले? मृतदेहांचा फोटो आला समोर
3
“नरेंद्र मोदींसारखेच पंतप्रधान देशाला वर्षानुवर्षे लाभो”; कुणाची सिद्धिविनायक चरणी प्रार्थना?
4
Video: पाच राफेल पाडल्याचा पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याचा दावा; पुरावा मागताच बोलती बंद...
5
सोफिया कुरेशींचा धर्म काय? राफेलची किंमत किती?; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तानी करू लागले गुगल सर्च
6
Operation Sindoor: मोठी तयारी! 'ऑपरेशन सिंदूर' 2.0 होणार? पंतप्रधान मोदींना भेटण्यासाठी अजित डोवाल पोहोचले
7
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूर हे वीर पत्नींच्या अश्रूंचं उत्तर, आमचं कुंकू आता शौर्य आणि..."; ऐशन्या झाली भावुक
8
"शक्य असेल तर वाचवा..."; ऑपरेशन सिंदूरचा उल्लेख करत जयपूरमधील स्टेडियम उडवून देण्याची धमकी
9
Rajnath Singh : 'ऑपरेशन सिंदूर' आणि हनुमान यांचा काय संबंध? राजनाथ सिंह यांनी सांगितला श्लोकाचा खरा अर्थ
10
Naxal Attack: नक्षलवाद्यांच्या भूसुंरुग स्फोटात तीन जवानांना वीरमरण; तेलंगणाच्या जंगलात तुफान चकमक
11
₹१,७०,००० वर जाणार हा शेअर, एक्सपर्ट बुलिश; दिला खरेदीचा सल्ला
12
"ते आताही पहारा देत होते...", 'ऑपरेशन सिंदूर'दरम्यान अभिनेत्रीने शहीद वडिलांच्या आठवणींना दिला उजाळा
13
Meta ने २३,००० फेसबुक अकाउंट अचानक केले गायब, 'या' लोकांवर मोठी कारवाई
14
“‘ऑपरेशन सिंदूर’ची कारवाई योग्यच, भारताने सूड घेतला, कुणी काही बोलू शकत नाही”: अण्णा हजारे
15
ऑपरेशन सिंदूर नंतर आणखी मोठी कारवाई होणार? केंद्राने हवाई दलाला दिले पूर्ण स्वातंत्र्य...
16
'ऑपरेशन सिंदूर'च्या रात्री १०.३० वाजता अखेरचं बोलणं, पहाटे ३ वाजता पुन्हा कॉल, पण...
17
प्रचंड गुप्तता, २ दिवसांपूर्वी अधिकारी क्वारंटाईन; 'ऑपरेशन सिंदूर'ची 'अशी' केली तयारी
18
“संधी मिळाली तर पाकचा खात्मा करून टाकेन”; कर्नल सोफिया कुरेशींच्या वडिलांची प्रतिक्रिया
19
पाकिस्तानच्या सुरक्षा सल्लागारांनी अजित डोवाल यांना फोन केला? तुर्की मीडियाचा दावा
20
सेटवर पोलीस आले अन् अभिनेत्याला घेऊन गेले; गर्लफ्रेंडने केले गंभीर आरोप, नेमकं प्रकरण काय?

‘पर्ल्स’विरोधात ठेवीदार एकवटले

By admin | Updated: December 2, 2014 00:18 IST

जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : ‘एमपीआयडी’ची केली मागणी

सातारा : ठेवीदारांच्या रकमा वेळेवर परत मिळत नसल्यामुळे ‘पीएसीएल’ तथा ‘पर्ल्स’ कंपनीवर ‘एमपीआयडी अ‍ॅक्ट १९९९’ अंतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी जिल्ह्यातील तीनशेहून अधिक ठेवीदारांनी सोमवारी अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यासचे जिल्हाध्यक्ष संदीप जगताप, ठेवीदार प्रतिनिधी चंद्रकांत घाडगे, तात्या ऊर्फ उत्तम सावंत आणि तीनशेहून ठेवीदारांनी सोमवारी सकाळी हुतात्मा स्मारकास अभिवादन केले आणि मोर्चाला सुरुवात केली. यावेळी ठेवीदारांनी आपल्या हातात फलक घेतले होते. फलकावर पर्ल्सचा निषेध करणारा मजूकर होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर आल्यानंतर त्याचे सभेत रूपांतर झाले.जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पर्ल्स कपंनीत रक्कम गुंतवलेल्या ठेवीदारांना मुदत संपल्यानंतरही रक्कम परत मिळालेली नाही. या कंपनीत सातारा जिल्ह्यातील सात हजारांहून अधिक ठेवीदारांचे जवळपास सातशे ते आठशे कोटी अडकून पडले आहेत. महाराष्ट्रातील लाखो ठेवीदारांचे जवळपास आठ हजार कोटी अडकून पडले आहेत. ‘पर्ल्स कंपनीवर महाराष्ट्र प्रोटेक्शन आॅफ इंटरेस्ट आॅफ डिपॉझिटर्स (इन फायनान्सिएल इस्टॅब्लिशमेंट) अ‍ॅक्ट १९९९’ नुसार कारवाई करावी. ‘एमपीआयडी अ‍ॅक्ट’च्या कलम ४ चे ३ तरतुदीनुसार जिल्हाधिकारी प्राधिकृत अधिकारी असून, त्यांनी प्रत्यक्ष गुंतवणूकदारांच्या तक्रारी ऐकून कारवाई करता येत असल्यामुळे पुढील कारवाईसाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची तरतूद आहे. असे झाले तर शासन कॉम्पिन्ट अ‍ॅथॉरिटी नेमून कंपनी आणि संचालकांच्या आणि त्याच्या नातेवाइकांच्या स्थावर, जंगम मालमत्ता जप्त करू शकणार आहे. परिणामी गुंतवणूकदारांच्या रकमा सुरक्षित होणार आहेत. यामुळे ठेवीदारांना मोठा आधार मिळणार आहे. (प्रतिनिधी)सोमवारपासून उपोषणपर्ल्स कंपनीने ठेवीदारांची रक्कम परत करत नसेल तर ठेवीदार ‘एमपीआयडी अ‍ॅक्ट’ अंतर्गत कारवाई करण्याच्या मागणीवर ठाम आहेत. ही कारवाई नाही झाली तर सोमवार, दि. ८ पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेवीदार उपोषणास बसणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.एजंटांनी घेतला कानोसा...‘पर्ल्स’विरोधात मोर्चा निघू नये म्हणून काही एजंट प्रयत्न करत असल्याची माहिती मोर्चात सहभागी झालेल्या ठेवीदारांनी दिली. विशेष म्हणजे, या मोर्चामध्ये तक्रारदारच सहभागी होणार असल्यामुळे ते कोण आहेत, याची माहिती एजंटांनी मिळविल्यामुळे ते ठेवीदारांशी संपर्क साधून मोर्चात सहभागी होऊ नका म्हणून विनंती करत असल्याची माहिती एका ठेवीदाराने यावेळी दिली. काही एजंट येथे कानोसा घेत असल्याचे ‘अण्णा हजारे भ्रष्टाचारविरोधी जनआंदोलन न्यास’च्या वतीने सांगण्यात आले. दरम्यान, एजंट कानोसा घेत असल्याची माहिती ठेवीदारांना मिळाल्याचे कळताच एजंटांनी येथून काढता पाय घेतला.