शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठातील कॅशलेस सुविधेचा बोजवारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2018 01:12 IST

< p >कोल्हापूर : ‘कॅशलेस’ व्यवहारासाठीची सुविधा बंद असल्याने प्रवेशासह विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन करताना ‘कार्ड नको, तर रोख पैसे भरा’ असे शिवाजी विद्यापीठात सांगितले आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार कॅशलेस व्यवहारासाठी आॅनलाईन पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनची सुविधा ...

<p>कोल्हापूर : ‘कॅशलेस’ व्यवहारासाठीची सुविधा बंद असल्याने प्रवेशासह विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन करताना ‘कार्ड नको, तर रोख पैसे भरा’ असे शिवाजी विद्यापीठात सांगितले आहे. त्यामुळे नाहक त्रास सहन करावा लागत असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे.विद्यापीठ अनुदान आयोग (यूजीसी)आणि केंद्र सरकारच्या आदेशानुसार कॅशलेस व्यवहारासाठी आॅनलाईन पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनची सुविधा विद्यापीठ प्रशासनाने उपलब्ध करून दिली. या सुविधांची सुरुवात केल्यानंतर विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमधील १०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये विविध स्वरूपांतील शुल्काचे चलन भरून घेताना डेबिट, क्रेडिट कार्डची सक्ती करण्यात आली. पेमेंट गेट-वे, पीओएस मशीनच्या सुविधेबाबत विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे प्रबोधन केले. विद्यार्थ्यांतूनही कॅशलेस सुविधेचे स्वागत करण्यात आले. मात्र, अचानकपणे गेल्या काही दिवसांपासून चलनासाठी कॅशलेस सुविधेच्या वापराऐवजी रोख पैसे भरण्यास सांगितले जात आहे. प्रवेश प्रक्रियेची धावपळ सुरू असतानाच कॅशलेस सुविधा बंद असल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. कॅशलेस व्यवहाराची सुविधा पूर्ववत सुरू करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, याबाबत विद्यापीठ प्रशासनाची भूमिका जाणून घेण्यासाठी प्र-कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबतची माहिती घेऊन वित्त व लेखाधिकाऱ्यांना योग्य ती कार्यवाही करण्याबाबत सूचना दिल्या जातील, असे सांगितले.ऐनवेळी एटीएमची शोधाशोधसध्या पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. ज्यांना अन्य शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घ्यावयाचा आहे, त्यांची काही प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, मायग्रेशन प्रमाणपत्र, आदी मिळविण्याची धावपळ सुरू आहे. अशा स्थितीत शुल्क हे कार्डद्वारे स्वीकारले जाते, अशी विद्यार्थ्यांना माहिती आहे. त्यानुसार मुख्य इमारतीमधील १०७ क्रमांकाच्या खोलीमध्ये चलन करण्यासाठी विद्यार्थी येतात.चलन करण्याच्या रांगेत थांबल्यानंतर काउंटरवर येताच त्यांना ‘कार्ड चालणार नाही, रोख पैसे द्या’ असे सांगितले जात आहे. कार्ड असल्याने शक्यतो अनेकजण रोख स्वरूपात पैसे जवळ बाळगत नाहीत; त्यामुळे चलन करण्यासाठी अशा विद्यार्थ्यांना एटीएमची शोधशोध करावी लागते. सांगली, साताºयाहून आलेले पालक, विद्यार्थ्यांना त्याचा अधिक त्रास होत असल्याचे काही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले.