शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

घनतिमिरात दिसेना वाट... कुटुंब शोधतेय कवडसा!

By admin | Updated: July 13, 2014 22:53 IST

एकुलत्याला उभं करायचंय : खेळण्याच्या वयात ताप मेंदूत शिरला; आर्थिक मदतीची गरज

सातारा : ‘ए तू माझा मुलगा आहेस, असं रडायचं असतं होय..? चल मन खंबीर करायचं अन् हसत-हसत घरी जायचं. तुला काही होणार नाही’, बस्स एवढंच वाक्य बोलेपर्यंत मनीषा येवले या माउलीचा जीव कंठाशी येतो. खेळण्या-बागडण्याच्या वयात पोरगं अंथरुणाला खिळलेलं पाहून भरदुपारी अंधारून आल्यासारखी अवस्था होते तिच्या मनाची! अठराविश्व दारिद्र्यामुळं हा काळोख अधिक गडद होतो अन् दिसत नाही एकही कवडसा... शेंदूरजणे, ता. कोरेगाव येथील येवले दाम्पत्य नोकरीच्या निमित्ताने वाढे येथे वास्तव्यास आले. गावाकडे जिरायत शेती. असून नसल्यासारखी. कुटुंबाची दोन वेळची सोय व्हावी म्हणून मुकुंद येवले यांनी वाहनचालकाची नोकरी पत्करली. नोकरी आणि शेती अशी दुहेरी कसरत करत मुलांच्या शिक्षणाचे पाहिले. आकाशच्या शिक्षणात गरिबीचा व्यत्यय येऊ नये म्हणून तो त्याच्या मामाकडे मुंबईला राहत होता. त्याची छोटी बहीण आकांक्षा दहावीत कन्या शाळेत शिकतीये. आता उन्हाळ्याच्या सुटीत तो त्याच्या आजोळी म्हणजे फलटण तालुक्यातील घाडगेवाडी येथे आला होता. मोकळं मैदान, धम्माल करायला त्याच्याच वयाची मुलं... मग काय, रोज क्रिकेटचे डाव सुरू झाले. पण मुंबईच्या वातावरणात वाढलेल्या आकाशला हे मोकळेपण सोसलं नाही. तो आजारी पडला. किरकोळ थंडी-ताप असेल असं म्हणत त्याला स्थानिक औषधोपचार दिले गेले. परिणाम होईना, हे पाहून त्याला साताऱ्यात आणले. इथे डॉक्टरांनी धक्कादायक माहिती दिली. ताप मेंदूत शिरल्यामुळे त्याचे अर्धे शरीर अचेत झाल्याचा निष्कर्ष डॉक्टरांनी काढला. हे ऐकल्यावर कुटुंबीयांच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याच्या उपचाराचा खर्चही लाखांच्या घरात सांगितला. मुलाच्या प्राणापेक्षा काहीच मोठं नाही असं म्हणत येवले यांनी उपचार करण्यास परवानगी दिली.आकाश मे महिन्यापासून येथील एका खासगी रुग्णालयात उपचार घेत आहे. त्याचे बिल शनिवारपर्यंत सव्वाचार लाख रूपये होते. नातेवाइक आणि आप्तेष्टांनी त्याच्या कुटुंबीयांना पावणेदोन लाख रूपये दिले. अजून अडीच लाख रूपये देणे शिल्लक आहे. येवले यांच्याकडचे आर्थिक स्रोत संपले आहेत. वैद्यकीय उपचार पूर्ण झाले असून आता डॉक्टरांनी आकाशला घरी जाण्याचा सल्ला दिला आहे. बिल न भरल्यामुळे तो अद्याप दवाखान्यातच आहे. आता त्याला गरज आहे, ती समाजातील दानशूर लोकांनी आर्थिक पाठबळ देण्याची. (प्रतिनिधी)