शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

प्रत्येक लोकसभा मतदार संघात दीड लाख मतांपर्यंत हेराफेरी :-उदयनराजेंचा खळबळजनक आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2019 01:02 IST

‘देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही सुरू झालीय. याबाबत कोणी आवाज उठवला तर त्याला धमक्या दिल्या जातात. ईडी, सीबीआय, रॉ यांचा ससेमिरा मागे लावला जातो.

ठळक मुद्देदेशात हुकूमशाही सुरू; आवाज उठवणाऱ्यांना धमक्या

महाबळेश्वर : ‘देशात लोकशाही संपुष्टात येऊन हुकूमशाही सुरू झालीय. याबाबत कोणी आवाज उठवला तर त्याला धमक्या दिल्या जातात. ईडी, सीबीआय, रॉ यांचा ससेमिरा मागे लावला जातो. ईव्हीएममध्ये घोटाळा करून सत्तेवर आलेल्यांनी प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक ते दीड लाख मतांची हेराफेरी केली आहे,’ असा खळबळजनक आरोप खासदार उदयनराजे भोसले यांनी केला.

महाबळेश्वर येथे महाबळेश्वर मधोत्पादक सहकारी सोसायटीत सेंद्रीय मध उत्पादन व सभासद विमा संरक्षण प्रारंभ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाळासाहेब भिलारे, मधुसागरचे अध्यक्ष संजय गायकवाड, सभापती रुपाली राजपुरे, उपनगराध्यक्ष अफजल सुतार, जिल्हा बँकेचे संचालक राजेंद्र राजपुरे, माजी नगराध्यक्ष किसनराव शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.

खासदार उदयनराजे म्हणाले, ‘स्थानिक भूमिपुत्रांनी कुठे दोन खोल्या बांधल्या की अधिकारी कायद्याचा बडगा दाखवून कारवाई करतात. परंतु सर्व कायदे धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करत विनापरवाना बंगले व हॉटेल बांधणाºया धनिकांना पालिका अधिकारी हे पायघड्या घालतात. अशा धनिकांविरोधात कोणी तक्रार केली तर बघू, करू, अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे येथील अधिकाऱ्यांना झालंय तरी काय? असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही.’

यावेळी खादी ग्रामोद्योगचे संचालक डी. आर. पाटील, वनक्षेत्रपाल रणजित गायकवाड, पंचायत समितीच्या उपसभापती अंजना कदम, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दत्तात्रय वाडकर, रोहित ढेबे, माजी नगराध्यक्ष युसूफ शेख, माजी सभापती अ‍ॅड. संजय जंगम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाबूराव सपकाळ, मनिष भंडारी, संजय उतेकर, सुभाष कारंडे, विशाल तोष्णीवाल, संजय पारठे, प्रशांत आखाडे, चंद्रकांत आखाडे, संदीप मोरे, बापू शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.संस्थेचे अध्यक्ष संजय गायकवाड यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून प्रास्ताविक केले. उपाध्यक्ष अशोक भिलारे यांनी सूत्रसंचालन केले.

हरित लवादाचे भूत मानगुटीवर...गावठाण विस्तार, चटई क्षेत्रात वाढ, बेघरांची समस्या असे स्थानिकांचे अनेक प्रश्न गेली अनेक वर्षे प्रलंबित आहेत. यामध्ये आता हरित लवादाचे भूत महाबळेश्वर तालुक्याच्या मानगुटीवर बसविण्यात आले आहे. हे सर्व प्रश्न एका वर्षाच्या आत मार्गी लावण्यासाठी आमदार मकरंद पाटील यांच्याबरोबर प्रयत्न करणार आहे, असे सांगून उदयनराजे पुढे म्हणाले, ‘एका बाजूला पर्यटकांची संख्या वाढावी, यासाठी आपण प्रयत्न करीत असतो. शासन जाहिरात करीत असते. वाढलेल्या पर्यटकांच्या सोयीसाठी स्थानिकांनी काही केले तर लगेच त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारला जातो.’

महाबळेश्वर येथील कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले यांचा सत्कार आमदार मकरंद पाटील यांनी केला. यावेळी बाळासाहेब भिलारे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते. (छाया : अजित जाधव)

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेElectionनिवडणूक