शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्याच्या सुताला परदेशातही मागणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2015 00:08 IST

शिवेंद्रसिंहराजे भोसले : अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणीची वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत

सातारा : ‘दिवंगत अभयसिंंहराजे भोसले यांनी अजिंंक्य उद्योग समूहाची निर्मिती करुन सातारा तालुक्यात सहकारक्रांती केली. अजिंक्यतारा सूतगिरणी उभारून उत्तमरीतीने चालविण्याचे भाऊसाहेब महाराजांचे स्वप्न सभासदांच्या सहकार्याने साकारले आहे. अजिंक्यताराच्या सुताला देशभरात मागणी आहे,’ अशी माहिती अजिंक्य उद्योग समूहाचे मार्गदर्शक आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली. वळसे, ता. सातारा येथील अजिंक्यतारा सहकारी सूतगिरणीच्या कार्यस्थळावर सूतगिरणीच्या २५ व्या वार्षिक साधारण सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी सूतगिरणीचे चेअरमन रामचंद्र बाळकृष्ण जगताप होते. यावेळी गिरणीचे उपाध्यक्ष हणमंतराव देवरे, सर्व संचालक, अजिंंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन रामभाऊ जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य राजू भोसले, जितेंद्र सावंत, किशोर ठोकळे, सातारा मार्केट कमिटीचे सभापती अ‍ॅड. विक्रम पवार, नगरसेवक प्रवीण पाटील, अजिंक्यतारा सहकारी बँकेचे चेअरमनङ्कविलासराव घोरपडे, व्हाईस चेअरमन देवदत्त राजमाने उपस्थित होते. आमदार शिवेंद्रसिंंहराजे म्हणाले, ‘सुधारित प्रकल्प अहवालानुसार गिरणीला राज्य शासनाकडून उर्वरीत १०५ लाखांचे भागभांडवल लवकरच मिळणार आहे. त्यातून आणखी २४०० चात्या उभारून १२ हजार चात्यांपर्यंत गिरणीची विस्तारवाढ करण्याचे नियोजन आहे. गिरणीच्या कामकाजात स्थानिक कामगारांचा मोलाचा वाटा आहे, त्यांना गिरणीने प्रशिक्षण तसेच वेळोवेळी पगारवाढ, सानुग्रह अनुदान, विमा संरक्षण आदी सुविधाही दिल्या आहेत. चात्यांच्या विस्तारवाढीनंतर आणखी बेरोजगार युवक व महिलांना गिरणीतङ्करोजगार उपलब्ध होणार आहे.’ ‘अजिंंक्यतारा सूतगिरणीने २०१४-१५ या वर्षात उत्कृष्ट आर्थिक व तांत्रिक कार्यक्षमता सिध्द केली आहे. या वर्षात २३ कोटी ४८ लाख रुपये किमतीच्या सुताची विक्री केलेली आहे. सुताचा दर्जा नेहमीच उच्चप्रतीचा ठेवण्यात आला आहे. त्यामुळे गिरणीचे सूत परदेशी निर्यात करण्यात आले, ही बाब सर्वांच्या दृष्टीने अभिमानाची आहे. सूत उत्पादन चालू झाल्यापासून गिरणीस सलग दुसऱ्या वर्षी ‘अ’ आॅडिट वर्ग मिळाला आहे,’ असेही आ. शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांनी सांगितले.आमदार शिवेंद्रसिंंहराजे भोसले यांची सातारा जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी गिरणीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी व्यवस्थापक दत्तात्रय मोरे, अजिंक्य बझारचे चेअरमन यशवंतराव साळुंखे, संचालक प्रकाश नाईक, जिल्हा खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. सूर्यकांत धनवडे, अजिंक्यतारा साखर कारखान्याचे संचालक चंद्रकांत घोरपडे, अनंता वाघमारे, सर्जेराव सावंत, सुरेशराव कदम, जयसिंग कणसे, रामङ्कपवार, मनोहर घाडगे, माजी संचालक संपतराव जाधव, दिलीप फडतरे, थोराजी ढाणे, अशोकराव मोरे, जिहेचे माजी सरपंच जयवंतराव फडतरे, गोवे सोसायटीचे माजी चेअरमन भानुदास चवरे, विनोद जाधव, अजिंक्य बझारचे प्रमोद जाधव, बी. एस. जाधव, डॉ. शशिकांत साळुंखे, अकबर शेख, गजानन दळवी, सुनील काटे, गुलाबराव पाटील, जनार्दन जाधव-गोवे उपस्थित होते. संचालक उत्तमराव नावडकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)सवलतीत वीज देण्याची गरजवीज व कापूस दरवाढ व त्यामानाने सुतास योग्य दर मिळत नसल्याने तसेच उत्पादन खर्चातील वाढीमुळे अनेक गिरण्या अडचणीत आल्या आहेत. यावर राज्य शासनाने किमान सवलतीच्या दरात गिरण्यांना वीजपुरवठा करून त्वरित उपाययोजना करण्याची नितांत आवश्यकता आहे. सहकारी सूतगिरण्यांना शाश्वत व रास्त दरात कापूस उपलब्धता, सूतदरावर नियंत्रण व वीजदरात सवलत मिळाल्यास सूतगिरणी देशाच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण योगदान देईल. त्यामुळे यासाठी शासनाने योग्य ती पावले उचलणे आवश्यक आहे, असेही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी सांगितले.