शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

साताऱ्यांतील रस्त्यांना मंडपांचा अडथळा, पोलिसांचे दुर्लक्ष, नागरिकांमधून कारवाईची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2018 15:33 IST

सातारा शहरामध्ये केवळ तीन मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांवरही आता वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. असे असताना अनेकजण आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी रस्त्यातच मंडप उभारत आहेत. त्यामुळे सर्वसामांन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता वेठीस धरला जात असताना पोलिसांचे मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरिकांमधून होत आहे.

ठळक मुद्देसाताऱ्यांतील रस्त्यांना मंडपांचा अडथळापोलिसांचे दुर्लक्षनागरिकांमधून कारवाईची मागणी

सातारा : शहरामध्ये केवळ तीन मुख्य रस्ते आहेत. या रस्त्यांवरही आता वाहतुकीची कोंडी होऊ लागली आहे. असे असताना अनेकजण आपल्या घरगुती कार्यक्रमासाठी रस्त्यातच मंडप उभारत आहेत. त्यामुळे सर्वसामांन्य नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. संपूर्ण रस्ता वेठीस धरला जात असताना पोलिसांचे मात्र, याकडे दुर्लक्ष होत आहे. अशा लोकांवर कारवाई करावी, अशी मागणी नगरिकांमधून होत आहे.घरगुती कोणताही कार्यक्रम असो, सातात रस्ता खोदून मंडप टाकलाच म्हणून समजा. मंडपासाठी रस्ता खोदताना कोणीही परवानगी घेत नाही. घरगुती कार्यक्रम असल्यामुळे कोणी आडकाठी करत नाही. मात्र, संपूर्ण रस्ताच मंडपाने व्यापला जातो. त्यामुळे वाहन चालकांना याचा त्रास होतोच; शिवाय पादचाऱ्यांनाही या ठिकाणाहून जाता येत नाही.

वाटेतच खुर्ची, टेबल ठेवले जातात. परिणामी वाहन चालकांना दुसऱ्या रस्त्याने जावे लागते. साताऱ्यातील गल्लीबोळात तर रोज एक तरी मंडप पाहायला मिळतो. सार्वजनिक रस्त्यावर मंडप उभारून नागरिकांना वेठीस धरले जात असल्याचा नागरिकांकडून आरोप होऊ लागला आहे.|गेल्या काही दिवसांपूर्वी राजवाडा परिसरामध्ये रस्त्यात मंडप उभारण्यावरून वादावादी झाली होती. एका युवकाचा साखरपुडा होता. त्या युवकाने रस्त्यातच मंडप उभारला होता. लोकांना तेथून जाताही येत नव्हते. एका युवकाने याचा जाब विचारला असता दोघांमध्ये वाद झाला.

हा वाद विकोपाला जाण्यापूर्वीच एका नगरसेवकाने मध्यस्थी केल्याने वादावर पडदा पडला. हा वाद प्रातिनिधीक स्वरुपाचा असला तरी या कारणावरून अशा प्रकारचे वाद नेहमीच होत असतात. परंतु कार्यक्रमात व्यत्यय नको,म्हणून याकडे फारसे कोणी लक्ष देत नाही. याचा अनेकजण गैरफायदा उठवत असतात. पालिका प्रशासनाने रस्त्यात अडथळा आणणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरTrafficवाहतूक कोंडी