.......
जिल्हा बाहेरून येणारे नागरिक अस्वस्थ
सातारा : सातारा शहरात सार्वजनिक मुताऱ्यांची सोय नसल्याने जिल्ह्यातून येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. सातारा पालिकेने होत्या त्या म्हाताऱ्या काढून टाकल्याने केली जात आहे. नगरपालिकेच्या शहरात सार्वजनिक मुताऱ्या नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
.......
धूम बायकर्सचा त्रास
सातारा : शहरात धूम बायकर्सनी उच्छाद मांडला आहे. मुख्य बाजारपेठेत गर्दी असतानादेखील हे वाहनचालक वेगाने वाहने दामटत असतात. रात्रीच्या वेळीदेखील शांततेचा भंग करत हे वाहनचालक वेगाने वाहन चालवतात.
शाहुपुरीतील पुलामुळे नागरिकांची सोय
सातारा : शहरातून शाहूपुरी कडे जाणाऱ्या मार्गावर कोटेश्वर मंदिराच्या पुढच्या बाजूला प्रशस्त पूल बांधला गेला आहे, त्यामुळे वाहनधारकांची चांगली सोय झालेली आहे. या रस्त्यावर खड्ड्यांमधून डांबरीकरणाचे कामदेखील वेगाने सुरू आहे.