आदर्की : सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की खुर्द माध्यमिक विद्यालयाची इमारत हिंगणगाव फाटा येथे झाली आहे. विद्यालयाचे कामकाज सुरू झाल्याने विद्यार्थी, पालक, शिक्षकांची वर्दळ वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने तेथे गतिरोधक, पांढरे पट्टे ओढण्याची मागणी प्रवासी व पालकातून होत आहे.
सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की खुर्द ते आदर्की बुद्रुक दरम्यान हिंगणगाव फाटा (जिल्हा परिषद विश्रामगृह) येथे आदर्की खुर्द माध्यमिक विद्यालयाची इमारत झाली आहे. पाचवी ते दहावीपर्यंतचे वर्ग सुरू झाल्याने पालक, शिक्षक, विद्यार्थी यांची वर्दळ वाढली असून, शाळा भरताना, दुपारची सुटी यावेळी विद्यार्थी रस्ता ओलांडताना दिसत आहेत. या रस्त्यावरून ऊस वाहतुकीबरोबर एसटी, वडाप, खासगी माल वाहतूक मोठ्या प्रमाणात वेगात सुरू असतेण तरी अपघाताचा धोका लक्षात घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने गतिरोधक बसविण्याची मागणी होत आहे.