सातारा : सातारा शहरातील शेटे चौकात कचरा आणून टाकला जात आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी निर्माण होत आहे. परिणामी, कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
येथील शेटे चौकात सार्वजनिक स्वच्छतागृह आहे. या ठिकाणीच परिसरातील नागरिक काही विक्रेते कचरा आणून टाकतात. विशेषत: करून रात्रीच्या सुमारास हा कचरा टाकला जातो. त्यानंतर काहीतरी खाण्यास मिळेल या आशेने परिसरातील भटकी कुत्री प्लास्टिकच्या पिशव्या दातात धरून नेतातय; पण यावेळी पिशव्यातील गहाण रस्त्यावर सांडते. तसेच प्लास्टिकच्या मोकळ्या पडलेल्या पिशव्या वाऱ्याने वाहनधारकांच्या अंगावर येतात. परिणामी, परिसरात कचरा विस्कटला जातो. यामुळे परिसरात दुर्गंधी वाढली आहे. घंटागाडी सोडून उघड्यावर कचरा टाकणाऱ्या नागरिकांवर कारवाईची मागणी होत आहे.
..................................................................................