शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

निबंर्धांमुळे सातारा जिल्हा बँकेला ६ कोटींचा तोटा

By admin | Updated: June 21, 2017 18:46 IST

कोंडी फुटली : ३९९ कोटींच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारणार

आॅनलाईन लोकमतसातारा , दि. २१ : शासनाच्या निबंर्धामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्हा बँकेत नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या ३९९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.

केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २0१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या नोटा बँका आणि पोस्ट आॅफिसमध्ये जमा करण्यासाठी ३0 डिसेंबर २0१६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ग्राहकांनी नोटा जमा केल्या असल्या तरी बँकांकडे नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.

जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पोस्ट आॅफिसमध्ये पडून असलेल्या जुन्या ५00, १000 च्या नोटा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया स्वीकारणार आहे. अर्थ मंत्रायलाने याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. मागील आठवड्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी मागणी केली होती आणि शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनीही सदर विषय लाउन धरला होता.८ नोव्हेंबर २0१६ रोजी चलनातून ५00 आणि १000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ३0 डिसेंबर २0१६ पर्यंत बँकांमध्ये आणि पोस्ट आॅफिसमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असं अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज देणेही बँकांना कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल. रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.

३९९ कोटींवरील व्याजाचे काय?

जिल्हा मध्यवर्ती बँकांवर जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत निर्बंध घातले गेले. मात्र त्याआधी बँकेच्या खातेदारांकडून बँकेमध्ये ३९९ कोटी रुपये जमा केले होते. यावर होणार व्याज बँकेनेच सोसले. हे व्याज रिझर्व्ह बँक देणार का? याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हा बँकेची झाली होती कोंडी

एकीकडे रद्द नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारत नाही, दुसरीकडे ठेवीदारांना व्याज तर द्यावं लागतं, अशी बँकांची अडचण झाली होती. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पुढचे तीस दिवस ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे.

 

या आल्या अडचणी

 

- कर्ज पुरवठ्यावर मयार्दा- दैनंदिन कॅश व्यवहार मंदावले- जिल्हा बँकांची एटीएम सुविधा बंद- सर्वच व्यवहारांवर शिथिलता आली- बँकेत जमा असणाऱ्या रकमेवर व्याज द्यावे लागले