शहरं
Join us  
Trending Stories
1
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
2
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
3
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
4
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
5
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
6
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
7
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
8
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
9
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
10
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
11
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
12
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
13
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
14
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
15
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
16
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
17
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
18
शिंदेसेनेच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर; गोविंदासह 'या' ४० नेत्यांकडे प्रचाराची धुरा!
19
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
20
ऐन महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राज्य मंत्रिमंडळाची बैठक; चार मोठे निर्णय घेतले
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्ताव देण्यात दीपक चव्हाण शून्य

By admin | Updated: July 24, 2014 22:30 IST

स्थानिक विकास : संपूर्ण निधी खर्च करण्याचे सर्वच आमदारांपुढे आव्हान

सातारा : जिल्ह्यातील आमदारांनी या आर्थिक वर्षातील स्थानिक विकासनिधी विविध विकासकामांसाठी टाकण्याची प्रक्रिया सुरू केली असली तरी ती अजूनही संथगतीने सुरू आहे. आठपैकी तीन आमदारांचा यावर्षीचा निधी अजूनही काही कारणांमुळे मंजूर झालेला नाही, दोन आमदारांनी पंचवीस लाखांचा टप्पा ओलांडलेला नाही.फलटणचे आमदार प्रा. दीपक चव्हाण यांनी यावर्षी एकही काम मंजुरीसाठी अथवा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पाठविलेले नाही. जिल्ह्यातील सर्वच आमदारांनी २०१३-१४ चा मंजूर निधी प्रत्येकी दोन कोटी रुपये विकासकामांवर खर्च केला असला तरी यावर्षीचा दोन कोटी रुपये निधी आचारसंहिता लागू होईपर्यंत विकासकामांवर टाकला जाणार की, तो अखर्चित राहणार, याकडेच नजरा आहेत. दरम्यान, कोणत्याही आमदारांचा निधी मागे राहू नये, यासाठी जिल्हा नियोजन समिती कार्यालयात अनेकांची धावपळ सुरू आहे. आॅगस्टच्या दुसऱ्या अथवा तिसऱ्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत सर्व निधी विकासकामांवर टाकणे बंधनकारक आहे. हा निधी पुढील वर्षभरात केव्हाही खर्च झाला तरी चालेल; मात्र त्याच्या खर्चाला यावर्षी मंजुरी मिळणे आवश्यक आहे.आमदारांसाठी प्रत्येकवर्षी विविध विकासकामांसाठी दोन कोटी निधी मिळतो. तो दरवर्षी स्थानिक विकासासाठी खर्च करावयाचा असतो. यामध्ये साकव पूल, मंदिर जीर्णोद्धार, सभामंडप त्याचबरोबर इतर दुरुस्तींच्या कामाचा समावेश आहे. ग्रामपंचायत, स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी या नुसार गावपातळीवर आमदार निधी टाकतात आणि ती कामे पूर्ण होतात. या कामांचे आराखडे, अंदाजपत्रक सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेची ग्रामीण विकास यंत्रणा त्याचबरोबर इतर घटक तयार करते. अनेकदा ही कामे स्थानिक मजूर सेवा सोसायटींच्या माध्यमातूनही केली जातात.विलासराव पाटील-उंडाळकर, विक्रमसिंह पाटणकर, शशिकांत शिंदे, शिवेंद्रसिंहराजे भोसले, बाळासाहेब पाटील या आमदारांनी या आर्थिक वर्षात करावयाच्या कामांचे मंजुरीचे प्रस्ताव नियोजन समितीकडे पाठविले आहेत. त्याची कार्यवाही पावसाळा सपंल्यानंतर होईल, असे सध्यातरी दिसते.फलटणचे आमदार प्रा. दीपक चव्हाण यांनी यावर्षी एकही काम मंजुरीसाठी अथवा अंदाजपत्रक तयार करण्यासाठी पाठविलेले नाही. माणचे आमदार जयकुमार गोरे यांच्या निधीतून करण्यात येणाऱ्या कामांची अंदाजपत्रके तयार झाली असली तरी त्यांच्या काही कामांचे दाखले अजूनही नियोजन समितीला जिल्हा परिषदेतून मिळालेले नाहीत. वाईचे आमदार मकरंद पाटील यांच्या कामांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू आहे. (प्रतिनिधी) कऱ्हाड दक्षिणविलासराव पाटील-उंडाळकर३७ लाख१.६३ कोटीपाटणविक्रमसिंह पाटणकर२५.३३ लाख१.७४ कोटीकोरेगावशशिकांत शिंदे१३.८६ लाख१.८६ कोटीफलटणप्रा. दीपक चव्हाण(काहीच नाही)२ कोटीवाईमकरंद पाटील(मंजूर प्रक्रिया सुरू)२ कोटीसाताराशिवेंद्रसिंहराजे भोसले१.०२ कोटी९८ लाखमाणजयकुमार गोरे(अंदाजपत्रके तयार)२ कोटीकऱ्हाड उत्तरबाळासाहेब पाटील४९.९९ लाख१.५0 कोटी