शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

घोषणा होऊन अंमलबजावणी शून्य! कांदा उत्पादकांची निराशा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2018 23:33 IST

सातारा : कांद्याचे दर कोसळल्याने राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, ...

ठळक मुद्देनिर्णय होऊनही बाजार समितीला आदेशच नाहीत

सातारा : कांद्याचे दर कोसळल्याने राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मात्र, चार दिवस होऊनही अद्याप बाजार समितीला सूचना न आल्याने अनुदानसंदर्भात कोणत्याही स्वरुपाची अंमलबजावणी होताना दिसत नाही.

गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक झाल्याने कांद्याचे दर कोसळले. शेतकऱ्यांचा कांदा ५० पैशांपासून तीन रुपये किलो इतक्या कमी दरात विकला गेला. फलटण तालुक्यातील एका शेतकºयाने ५०० किलो विक्री करून वाहतूक आणि हमालीचे पैसे स्वत:च्या खिशातून द्यावे लागले. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर मंत्रालयातून दखल घेण्यात आली.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोसळलेल्या भावामुळे अडचणीत आलेल्या कांदा उत्पादकांना प्रतिक्विंटल २०० रुपये याप्रमाणे अनुदान देण्याचा निर्णय घेतला. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती वगळता राज्यातील सर्व बाजार समित्यांसाठी हा निर्णय लागू असेल. हे अनुदान थेट बँक हस्तांतरणाद्धारे शेतकºयांच्या बँक खात्यात जमा केले जाणार आहे. या योजनेसाठी एकूण १५० कोटींचा निधीही मंत्रिमंडळाने मंजूर केला.

मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे कांदा उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे राज्यभरातील कांदा उत्पादक शेतकºयांच्या आशा पल्लवित झाल्या. १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ या कालावधीत कृषी उत्पन्न बाजार समितीत कांदा विक्री केलेल्या शेतकºयांनी अनुदान घेण्यासाठी बाजार समितीमध्ये धाव घेतली. मात्र, विविध बाजार समिती प्रशासनाला राज्य शासनाकडून कोणतेही आदेश न मिळाल्याने घोषणेची अंमलबजावणी होत नाही.आदेशानंतर कार्यवाहीला सुरुवातराज्य शासनाने घेतलेल्या निर्णयाची सहकार व पणन विभागातर्फे बाजार समित्यांना आदेश किंवा सूचना येत असतात. अद्याप जिल्ह्यात इतर कोणत्याही बाजार समित्यांना कांद्या उत्पादकांच्या अनुदानाबाबत कार्यवाहीच्या सूचना आल्या नाहीत. जोपर्यंत प्रशासनाकडून सूचना येत नाही. तोपर्यंत अनुदान अंमलबजावणी होणार नाही.-विक्रम पवार,सभापती, सातारा कृषी उत्पन्न बाजार समिती

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMarketबाजार