शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: ‘युनेस्को’च्या वारसास्थळांत 'डेक्कन ट्रॅप्स'चा समावेश, ज्वालामुखी प्रांतांपैकी एक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 18:42 IST

युनेस्को डेक्कन ट्रॅप्स मध्ये भारतातील सात नव्या ठिकाणांचा समावेश..

पाचगणी : ‘युनेस्को’मधील जागतिक वारसास्थळांत महाराष्ट्रातील महाबळेश्वर आणि पाचगणी या पर्यटनस्थळांवरील डेक्कन ट्रॅप्सचा समावेश झाल्याने ही पर्यटनस्थळे जागतिक पटलावर आली आहेत. यासहित सात नव्या ठिकाणांचा समावेश ‘युनेस्को’कडून भारताच्या जागतिक वारसाच्या तात्पुरत्या यादीत करण्यात आला आहे. युनेस्कोमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाने म्हटले आहे की, या ठिकाणांच्या समावेशाने भारताच्या ‘समृद्ध सांस्कृतिक वारशाच्या जतन आणि संवर्धनाची वचनबद्धता प्रतिबिंबित झाली आहे.’दि. १२ सप्टेंबर रोजी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर एका पोस्टमध्ये युनेस्को (इंडिया)ने म्हटले आहे की, ‘युनेस्को’मधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाला हे जाहीर करताना आनंद होत आहे की, भारतातील सात ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश करण्यात आला आहे.युनेस्कोमधील भारताच्या स्थायी प्रतिनिधी मंडळाने एका निवेदनात म्हटले आहे की, नैसर्गिक श्रेणीतील या सात संपत्तीमध्ये महाराष्ट्रातील पाचगणी आणि महाबळेश्वर येथील डेक्कन ट्रॅप्स, सेंट मेरी बेटांचा भूगर्भीय वारसा (उडपी, कर्नाटक), मेघालयातील गुहा (पूर्व खासी टेकड्या, मेघालय), नागा हिल ओफिओलाइट (किफिर, नागालँड) यांचा समावेश आहे.

ज्वालामुखी प्रांतांपैकी एक

महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात असलेले पाचगणी आणि महाबळेश्वर येथील दख्खन पर्वतीय रांग जगातील सर्वात महत्त्वाच्या आणि विस्तृत बेसाल्टिक ज्वालामुखी प्रांतांपैकी एक आहेत.

पाचगणी हे टेबललँड सपाट-आडव्या कॅप्रॉकपासून बनलेले आहेत आणि सर्व बाजूंनी खरखरीत आहेत. फेरिक्रेट ड्युरिक्रस्ट (किंवा लॅटराइट्स) कॅप्रॉक म्हणून काम करतात.

टेबललँड हे सपाट उंच माथ्यावर प्रकार आहे, जे प्रामुख्याने बेसाॅल्ट खडकांमुळे तयार होतात आणि महाराष्ट्रात पाचगणीसारख्या ठिकाणी आढळतात. बेसाल्ट हा ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या लाव्हापासून तयार होणारा एक प्रकारचा खडक आहे, जो थंड होऊन पठार आणि टेकड्या तयार करतो.