शहरं
Join us  
Trending Stories
1
"अब की बार ४०० पार’’, या ३ एक्झिट पोलनी वर्तवला मोदी आणि एनडीएच्या बंपर विजयाचा अंदाज
2
राज्यातील ६ मतदारसंघांमध्ये लागणार सर्वाधिक धक्कादायक निकाल;'जायंट किलर' ठरू शकतात 'हे' उमेदवार
3
 ‘चाणक्य’चा मविआला धक्का, इंडिया टुडेच्या पोलनेही टेन्शन वाढवलं, महायुती जिंकणार तब्बल एवढ्या जागा
4
Exit Poll Result: बारामतीसह इतर ठिकाणीही अजित पवारांना मोठा धक्का; राष्ट्रवादीच्या जागांचा 'असा' आहे अंदाज
5
सांगली लोकसभेत मोठा धमाका होणार; कोण आघाडीवर? एक्झिट पोलचे आकडे आले समोर
6
T20 WC 24, IND vs BAN Live : हार्दिक पांड्याचा रूद्रावतार; पंतचे अर्धशतक, भारतासाठी खुशखबर
7
कोल्हापूर, हातकणंगलेत कोण आघाडीवर? महायुतीला धक्का? एक्झिट पोलमध्ये कोण आघाडीवर
8
वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ अमेरिकेत दाखल; गावस्करांना पाहून बाबरनं काय केलं? Video
9
दिल्लीत आप-काँग्रेस आघाडी, केजरीवाल यांचं सहानुभूतीचं राजकारण निष्प्रभ, भाजपा पुन्हा मारणार बाजी
10
उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा मोदी लाट, राहुल-अखिलेश भुईसपाट, भाजपा पुन्हा जिंकणार रेकॉर्डब्रेक जागा 
11
Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा
12
IND vs BAN Live : वर्ल्ड कपची तयारी सुरू! विराट कोहली आज बाकावर; रोहितसोबत संजू मैदानात
13
दिनेश कार्तिकचा क्रिकेटला 'पूर्णविराम', स्टार खेळाडूची निवृत्ती, टीम इंडियाचा खरा 'इम्पॅक्ट'
14
Exit Poll: महाराष्ट्रात मोठी उलथापालथ; महाविकास आघाडीची जोरदार मुसंडी, असे आहेत आकडे
15
IND vs BAN Live : ...म्हणून विराट कोहली सराव सामना खेळत नाही; रोहित शर्मानं सांगितलं कारण
16
Lok Sabha Election Exit Poll Results 2024 : कर्नाटकात इंडिया आघाडीला धक्का? एक्झिट पोलचे आकडे आले समोर, एनडीएसाठी खुशखबर
17
मोठी बातमी: दक्षिण भारतातील एक्झिट पोलचे आकडे समोर; कोणाला, किती जागा?
18
Exit Poll : बीडमध्ये पंकजा मुंडेंकडे आघाडी तर नगरमध्ये भाजपला मोठा धक्का!
19
शेवटच्या क्षणी काँग्रेसने विचार बदलला; 'एक्झिट पोल'बाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय
20
‘इंडिया’ आघाडी २९५ हून अधिक जागा जिंकेल, एक्झिट पोलचे आकडे येण्यापूर्वी खर्गेंचा मोठा दावा 

भाऊ बुडाल्याच्या धक्क्याने वाचलेल्या बहिणीचाही मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 17, 2017 12:17 AM

लोकमत न्यूज नेटवर्कलोणंद : पुरात बुडालेल्या भावाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मानसिक धक्क्याने बहिणीचाही मृत्यू झाला. मयत पुष्पा शिवाजी जाधव (वय ४५)यांनाही पुरातून वाचविण्यात आले होते.याबाबत माहिती अशी की, वाई अन् खंडाळा तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे लोणंद परिसरात पूर परिस्थिती ओढावली. खेमवती नदीला अचानक आलेल्या पुरातून जात असताना पुष्पा ...

लोकमत न्यूज नेटवर्कलोणंद : पुरात बुडालेल्या भावाच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार केल्यानंतर मानसिक धक्क्याने बहिणीचाही मृत्यू झाला. मयत पुष्पा शिवाजी जाधव (वय ४५)यांनाही पुरातून वाचविण्यात आले होते.याबाबत माहिती अशी की, वाई अन् खंडाळा तालुक्यात रविवारी रात्री ढगफुटी सदृश्य पावसामुळे लोणंद परिसरात पूर परिस्थिती ओढावली. खेमवती नदीला अचानक आलेल्या पुरातून जात असताना पुष्पा शिवाजी जाधव (४५) व प्रशांत शिवाजी जाधव (२८) तसेच अतुल भंडलकर हे वाहून जाऊ लागले. यावेळी उपस्थित तरुणांनी साखळी करून व दोरीच्या साह्णाने पुष्पा जाधव व प्रशांत जाधव या मायलेकरांना वाचविले; परंतु अतुल भंडलकर हे पुराच्या पाण्यात वाहून गेले.अतुल भंडलकर यांच्यावर दुपारी एक वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यानंतर अडीच वाजण्याच्या सुमारास पुष्पा जाधव यांना अस्वस्थ वाटू लागले.त्यांना श्वासोच्छ्वास करताना त्रास होऊ लागला. दम लागत असल्याने त्यांना नातेवाइकांनी तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल केले. तेथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी पुण्याला हलविण्याचा सल्ला देण्यात आला. रुग्णवाहिकेतून पुण्याला नेत असताना वाल्हे हद्दीत त्यांचा मृत्यू झाला. तेथूनच मृतदेह लोणंदला आणण्यात आला.एका दिवसात बहिण-भावाचा मृत्यू झाल्याने गावावर शोककळा पसरली आहे.