शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

सर्पदंश झाल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 18:40 IST

Snake Bite Satara : पाटण तालुक्यातील लेंढोरी गावातील रोहित महिपती सुतार (वय १५) या आठवीतील विद्यार्थ्याला रात्री झोपेत असताना सर्पदंश झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात जाऊनही वेळेत उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देसर्पदंश झाल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू लेंढोरीतील घटना : उपचारासाठी नातेवाइकांची परवड

कोयनानगर : पाटण तालुक्यातील लेंढोरी गावातील रोहित महिपती सुतार (वय १५) या आठवीतील विद्यार्थ्याला रात्री झोपेत असताना सर्पदंश झाला. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. रुग्णालयात जाऊनही वेळेत उपचार न मिळाल्याने मुलाचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांचे म्हणणे आहे.लेंढोरी येथील रोहित सुतार हा मुलगा रविवारी रात्री आपल्या कुटुंबीयांसोबत घरामध्ये झोपला असताना, मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याच्या कानाला मण्यार जातीच्या विषारी सापाने दंश केला. रोहितला नातेवाइकांनी तत्काळ उपचारासाठी पाटणच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, अधिक उपचारार्थ त्याला कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यास सांगण्यात आले.

कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातही डॉक्टरांनी दाखल न करताच, कृष्णा हॉस्पिटलला नेण्यास सांगितले. त्यानंतर, सह्याद्री व श्री हॉस्पिटलला उपचारासाठी फिरविण्यात आले. मात्र, कऱ्हाडमधील कोणत्याही हॉस्पिटलने उपचारासाठी रोहितला दाखल करून घेतले नाही. अखेर पहाटे साडेचार वाजण्याच्या सुमारास रोहितला कऱ्हाडहून साताराला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आणि काही मिनिटांच्या कालावधीत त्याचा मृत्यू झाला.

रोहितवर वेळेत उपचार झाले असते, तर तो वाचला असता, असे नातेवाइकांचे म्हणणे असून, विविध रुग्णालयांमध्ये दाखल करून न घेतल्याने महत्त्वाचा वेळ वाया जाऊन उपचाराअभावी रोहितचा मृत्यू झाल्याचे नातेवाइकांनी सांगीतले.

टॅग्स :snakeसापhospitalहॉस्पिटलSatara areaसातारा परिसर