शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे साताऱ्यात गर्भवती महिलेचा मृत्यू, जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांनी घातला गोंधळ

By नितीन काळेल | Updated: November 4, 2022 14:36 IST

नातेवाईकांनी गोंधळ घातल्याने तणावाचे वातावरण

सातारा : जिल्हा शासकीय रुग्णालयात कोरोनामुळे गर्भवती महिलेचा मृत्यू झाल्यानंतर नातेवाईकांनी डॉक्टरांवर हलगर्जीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेमुळे जिल्हा रुग्णालय परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला होता.याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी की, सातारा शहरातील एक २१ वर्षांची गर्भवती महिला ३१ ऑक्टोबर रोजी दिवंगत क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाली होती. त्यावेळी महिलेला थंडी आणि ताप अशी लक्षणे होती. त्यातच महिला गर्भवती आणि पोटात दोन बाळे असल्याने अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते. असे असतानाच महिलेची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आली होती. त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु होते. दरम्यान, काल, गुरुवारी सायंकाळपासून महिलेला श्वास घेण्यास त्रास होवू लागला. त्यामुळे व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले. त्यानंतर रात्री आठच्या सुमारास संबंधित महिलेचा मृत्यू झाला.दरम्यान, आज, शुक्रवारी सकाळी मृत महिलेचे नातेवाईक जिल्हा शासकीय रुग्णालयात आले आणि गोंधळाचे वातावरण तयार झाले. त्यांनी डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा तसेच शेवटच्या क्षणी रुग्णाला अधिक उपचारासाठी पुण्याला नेण्यास सांगितले असा आरोप केला. या गोंधळामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे पोलिसांना पाचारण करावे लागले. यादरम्यान, जिल्हा शलचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दालनात डॉक्टर आणि नातेवाईकांना बोलवून चर्चा घडवून आणली. त्यानंतर नातेवाईकांना खरी परिस्थिती सांगितली.

संबंधित महिलेला कोरोनाची लागण झाल्याने त्याप्रकारे उपचार करण्यात आले. पण, गुरुवारी सायंकाळनंतर महिलेला श्वास घेण्यास त्रास झाला. यामध्ये तिचा मृत्यू झाला. नातेवाईकांना परिस्थिती समजावून सांगितली. डॉक्टरांचा कोठेही हलगर्जीपणा झालेला नाही.  - डॉ. सुभाष चव्हाण, जिल्हा शल्यचिकित्सक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरhospitalहॉस्पिटल