शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

वडिलांच्या पुण्यतिथीला मुलीचाही मृत्यू

By admin | Updated: May 26, 2017 23:03 IST

वडिलांच्या पुण्यतिथीला मुलीचाही मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : वडिलांचा अपघातात मृत्यू झाला होता. बरोबर बारा वर्षानंतर त्याच दिवशी एकुलत्या एक मुलीचाही अपघातात दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना येथील विकासनगरमध्ये शुक्रवारी दुपारी घडली.सायली अनील चव्हाण (वय १७, रा. महागाव ता. सातारा) असे दुर्देवी युवतीचे नाव आहे. याबाबत माहिती अशी की, सायली चव्हाण आणि मामेभाऊ सचिन बोरगे (वय ३०,रा. खटाव) हे शुक्रवारी दुपारी खटावकडे दुचाकीवरून निघाले होते. विकासनगर येथील पेट्रोलपंपावर पेट्रोल भरून ते रस्त्यावर येत होते. याचवेळी एसटी दहिवडीकडे निघाली होती. या एसटीच्या डाव्या बाजुला दुचाकीची धडक बसली. पाठीमागे बसलेली सायली उडून एसटीच्या पाठीमागील चाकाखाली सापडली. सचिन बाजूला फेकला गेला. एसटीचे चाक सायलीच्या अंगावरून गेल्याने तिचा मृत्यू झाला.प्रत्यक्षदर्शींनी आरडाओरड करून मुलगी चाकाखाली सापडल्याचे एसटी चालकाला सांगितले. मात्र हे चालकाच्या लक्षात आले नाही. कसलातरी आवाज आल्याने चालकाने ब्रेक लावला. चाकाचे व्रण डांबरावर दिसून येत होते. जमाव मारहाण करेल, या भितीने चालक आणि वाहकाने शहर पोलिस ठाण्यात येऊन अपघाताची माहिती दिली.अपघाताचे वृत्त विकासनगर आणि महागाव परिसरात समजताच नातेवाईक व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. तोपर्यंत सायलीचा मृतदेह त्याच अवस्थेत होता. नातेवाईकांनी सायलीचा मृतदेह पाहातच हंबरडा फोडला. त्यांचा आक्रोश पाहून उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाहीत.पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगविला. त्यानंतर रुग्णवाहिकेतून सायलीचा मृतदेह जिल्हा रुग्णायात आणला. या ठिकाणीही महागाव येथील ग्रामस्थांनी गर्दी केली होती.दरम्यान, सायली ही वारणानगर येथील तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी विद्यालयात शिकत होती. ती शिक्षणात हुशार होती. गुरूवारी तिचा निकाल लागला. त्यात ती महाविद्यालयामध्ये दुसरी आल्याचे नातेवाईक सांगत होते.सायली ही एकुलती एक होती. तिची आईही दुर्धर आजाराने त्रस्त आहे. सायलीवरच ती अवलंबून होती. मात्र एकुलती एक असलेल्या सायलीचा असा अपघाती मृत्यू झाल्याने तिच्या आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. असाही योगायोगसायली चव्हाण हिच्या वडिलांचा २६ मे २००५ रोजी पाटण येथील मल्हार पेठ पोलिस चौकीसमोर अपघाती मृत्यू झाला होता. बरोबर बारा वर्षानंतर २६ मे २०१७ ला सायलीचाही अपघातही मृत्यू झाला. या दुर्देवी योगायोगाची महागावमध्ये शुक्रवारी दिवसभर चर्चा होती. तिच्या वडिलांच्या दुचाकीलाही वाहनाने धडक दिली.