शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित साटम मुंबई भाजपाचे नवे अध्यक्ष; महापालिकेत नवा रेकॉर्ड करणार, CM देवेंद्र फडणवीसांचा दावा
2
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
3
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
4
'किंग कोहली' परत येतोय... ऑस्ट्रेलियाची धुलाई करण्यासाठी विराटची 'लॉर्ड्स'वर नेट प्रॅक्टिस
5
२ शेअर्सवर मिळणार २५ मोफत! 'या' ८ कंपन्या देणार बोनस शेअर्स, वाचा रेकॉर्ड डेटची माहिती
6
Share Market Opening 25 August, 2025: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
7
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
8
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
9
महालक्ष्मी योगात हरितालिका व्रत २०२५: पूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त; स्वर्णगौरीची कहाणी
10
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
11
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
12
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
13
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
14
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
15
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
16
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
17
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
18
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
19
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
20
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली

मृतदेहाची आता टळेल हेळसांड!

By admin | Updated: January 16, 2015 23:47 IST

विच्छेदनाची सुविधा : पिंपोडे ग्रामीण रुग्णालय सज्ज

पिंपोडे बुद्रुक : ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक येथील शवविच्छेदन कक्षाचे बांधकाम पूर्ण झाले असून आता कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील नागरिकांची खूप मोठी अडचण दूर होणार असून जवळच शवविच्छेदनाची सोय झाल्यामुळे मृतदेहाची हेळसांड थांबणार असून नातेवाईकांनाही मनस्ताप सहन करावा लागणार नाही.याबाबत वृत्त असे की, पिंपोडेचे ग्रामीण रुग्णालय नेहमीच या ना त्या कारणाने चर्चेचा विषय ठरले होते. अनेकवेळा येथील कारभारामुळे हे रुग्णालय आंदोलनाचे ठिकाण बनले होते. मात्र गेल्या दोन वर्षांपासून येथील वैद्यकीय अधीक्षकांनी रुग्णालयाचा चेहरा-मोहरा बदलला आहे. आज रुग्णालयात किमान दररोज दोनशेच्या आसपास रुग्ण सेवेचा लाभ घेत आहेत. रुग्णालयासाठी शवविच्छेदन कक्षाची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. मात्र, त्याकडे प्रशासकीय पातळीवरून दुर्लक्ष केले जात होते.एखादा अपघात अथवा दुर्घटना घडल्यास तो मृतदेह शवविच्छेदन केल्याशिवाय नातेवाईकांच्या ताब्यात दिला जात नाही. त्यामुळे आतापर्यंत सातारा, कोरेगाव, रहिमतपूर, वाई, भुर्इंज याठिकाणी शवविच्छेदनासाठी मृतदेह घेऊन जावे लागत असे. यामध्ये पोलिसांसह संबंधित मृताच्या नातेवाईकांना खूप मनस्ताप सहन करावा लागत असे. अनेक तास मृतदेह ताब्यात मिळण्यासाठी लागत असत. परिणामी वेळेसह पैशाचाही अपव्यय होत होता. त्याचबरोबर शवविच्छेदन अहवाल मिळण्यासाठी विलंब होत असे. त्यामुळे मृत्यूचे नेकमे कारण समजू शकत नव्हते. त्यामुळे नातेवाईकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.इमारतीसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व तांत्रिक बाबी पूर्ण झाल्या असून लवकरच शवविच्छेदनाची सोय उपलब्ध होणार असल्यामुळे येथील नागरिकांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. (वार्ताहर)शवविच्छेदन कक्षाचे बांधकाम पूर्ण झाले आहे. तांत्रिक बाबी पूर्ण आहेत. आवश्यक कर्मचारी मागणीसाठी प्रशासकीय पातळीवर पत्रव्यवहार केला आहे. लवकरच सेवा उपलब्ध करून देण्याचा मानस आहे.- डॉ. ज्ञानेश्वर शितोळे, वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुक५० गावांना होणार लाभउत्तर व पूर्व कोरेगावकडील जवळपास ५० गावांना याचा लाभ होणार आहे. या श्वविच्छेदन कक्षासाठी आरोग्य सेवा संचालकांनी २४ जानेवारी २०१३ रोजी प्रशासकीय मान्यता दिली होती. १३ जुलै २०१३ रोजी सुरू झालेले काम ३१ मार्च २०१४ रोजी पूर्ण झालेले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने ४ आक्टोबर २०१४ रोजी ही इमारत ग्रामीण रुग्णालय पिंपोडे बुद्रुकच्या वैद्यकीय अधीक्षकांकडे हस्तांतरीत केली आहे. इमारत पूर्ण करण्यासाठी २१ लाख रुपये खर्च करण्यात आला आहे.