शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: उरमोडी धरणात बुडालेल्या तरुणाचा मृतदेह सापडला, पोहताना दम लागून बुडाला

By दत्ता यादव | Updated: April 26, 2023 13:43 IST

आज, बुधवारी दुसऱ्या दिवशी शोध मोहीम हाती घेतली असता सागरचा मृतदेह धरणाच्या मधोमध सापडला

सातारा : मित्रांसमवेत उरमोडी धरणात पोहायला गेलेल्या सागर महादेव देवकर (वय २१, रा. तारळे, ता. पाटण) याचा आज, बुधवारी सकाळी मृतदेह आढळून आला.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सागर देवकर हा साताऱ्यातील एका महाविद्यालयात शिकत होता. मंगळवारी दुपारी वर्गमित्रांसमवेत तो परळी, ता. सातारा येथील उरमोडी धरणाकडे फिरण्यासाठी गेला होता. यावेळी काही मुले उरमोडी धरणात पोहण्यासाठी उतरली. तेव्हा सागरलाही पोहण्याचा मोह आवरला नाही. त्याला चांगले पोहता येत होते. तो धरणात उतरल्यानंतर पोहत काही अंतर पुढे गेला. मात्र, त्याला दम लागला. त्याला परत सुद्धा येता आले नाही. अखेर गटांगळ्या खात तो बुडाला. 

त्याच्या मित्रांच्या हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी आरडाओरड केली. परंतु तो दिसेनासा झाला. त्यानंतर मित्रांनी याबाबत माहिती दिली. सातारा तालुका पोलिसांनाही याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसही तातडीने घटनास्थळी आले. शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमच्या जवानांनी साडेतीन तास शोध मोहीम राबविली. मात्र, सागरचा थांगपत्ता लागला नाही.दुसऱ्या दिवशी आज, बुधवारी सकाळी शोध मोहीम हाती घेण्यात आली. त्यावेळी सागरचा मृतदेह धरणाच्या मधोमध सापडला. सातारा तालुका पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरdrowningपाण्यात बुडणे