शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

आकडेवाले उजेडात बिल भरणारे अंधारात!, खर्चाचा बोजा ग्राहकांनाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:04 IST

फलटण पश्चिम भागात वीजवितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने बडे उद्योगपती आकडे टाकून वीज वापरत आहेत, तर सर्वसामान्य वीजग्राहक वेळेत वीजबिलभरूनही वीज मिळत नसल्याने अंधारात चाचपडावे लागत आहे. त्यामुळे आकडे टाकणारे उजेडात अन् वेळेत वीजबिल भरणारे अंधारात असे चित्र आदर्की परिसरात दिसत आहे.

ठळक मुद्देआकडेवाले उजेडात बिल भरणारे अंधारात!, खर्चाचा बोजा ग्राहकांनाच वायरमन, अधिकारी करतायत आकडे टाकणाऱ्यांचे पाठराखण

आदर्की : फलटण पश्चिम भागात वीजवितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे व कर्मचाऱ्याच्या आशीर्वादाने बडे उद्योगपती आकडे टाकून वीज वापरत आहेत, तर सर्वसामान्य वीजग्राहक वेळेत वीजबिलभरूनही वीज मिळत नसल्याने अंधारात चाचपडावे लागत आहे. त्यामुळे आकडे टाकणारे उजेडात अन् वेळेत वीजबिल भरणारे अंधारात असे चित्र आदर्की परिसरात दिसत आहे.फलटण पश्चिम भागात धोम-बलकवडी उजव्या कालव्यातून पाणी दुष्काळी भागात आले. त्यामुळे बागायती क्षेत्र वाढल्याने विजेची मागणी वाढली. त्या प्रमाणात ट्रान्सफॉर्मर संख्या वाढली नाही. मात्र, वीजवितरण कंपनी कृषीपंपाना ट्रान्सफॉर्मरच्या क्षमतेपेक्षा जादा वीज जोडणी दिली. त्यामुळे फ्यूज तुटणे, केबल जळणे, डी.ओ. जाणे, ट्रान्सफॉर्मर फेल होणे, असे प्रकार वांरवार घडू लागले आहेत. त्यामुळे वीज ग्राहकांना वर्गणी काढून केबल, फ्यूज बदलावे लागतात. त्यांना बिलही भरावे लागते.

पाण्यामुळे छोटे-उद्योग व्यवसाय वाढला आहे. शेतकरी बिल भरूनही वीजपुरवठा वांरवार खंडित होत असल्याने पिके वाळून जात आहेत. काहीजण विहिरीवर फक्त कृषिपंप, पाईपलाईन करतात; पण वीज चोरून आकडे टाकून घेतात. त्यामुळे ट्रान्सफॉर्मरवर विजेचा लोड येऊन वीजपुरवठा वांरवार खंडित होतो. केबल, फ्यूज, ट्रान्सफॉर्मर निकामी होतो. त्याचा खर्च नियमित वीज ग्राहकांना करावा लागतो. त्याबरोबर काही ठिकाणी गावठाण सिंगल फेज विद्युत वाहिनी गेली नाही त्या गाव, वाडी-वस्तीवर थ्रीफेज विद्युत वाहिनी गेली आहे. त्या वाहिनीच्या माध्यमातून घरगुती वीजपुरवठा दिला आहे.

ते ग्राहक प्रत्येक महिन्याला वीजबिल भरत असतात; पण आकडे टाकून वीज वापरतात त्यांच्यामुळे बिल भरणारे अंधारात राहतात, तरीही अधिकारी दुर्लक्ष करतात तर वायरमन गांधारीची भूमिका घेऊन आकडे टाकणाºयांचे पाठराखण करतात. त्यामुळे नियमित वीजबिल भरणारे अंधारात अन् आकडे टाकणारे उजेडात, अशी परिस्थिती आदर्की परिसरात दिसत आहे.कापशीच्या नव्या फिडरवरून वीजपुरवठाफलटण पश्चिम भागात १९६४ च्या दरम्यान सातारारोड फिडरवरून वीजपुरवठा होत होता. त्यानंतर १९९५ पासून लोणंद फिडरवरून वीजपुरवठा सुरू झाला. त्यानंतर कापशी येथे नव्याने फिडर उभारून आदर्की खुर्द, आदर्की बुद्रुक कापशी, आळजापूर, बिबी, घाडगेवाडी, मुळीकवाडी, कोराळे, वाघोशी, वडगाव, पिराचीवाडी गाव, वाड्या, वस्त्यांना वीज पुरवठा होतो.

टॅग्स :mahavitaranमहावितरणSatara areaसातारा परिसर