शहरं
Join us  
Trending Stories
1
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
2
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
3
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
4
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
5
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
6
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
7
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
8
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
9
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
10
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
11
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...
12
सरकारांना ईव्हींवर आणखी ऑफर्स द्याव्या लागणार? विक्रीच्या वेगावर निती आयोगाचे वक्तव्य...
13
छोट्या भावावर हात उचलणाऱ्याला कायमचं संपवलं; भावाचा बदला घेणारी २२ वर्षीय 'लेडी डॉन' कोण?
14
नवऱ्याचं पोट फाडलं, मृतदेहावर अ‍ॅसिड ओतलं; बॉयफ्रेंडसाठी तबस्सुमनं गाठला क्रूरतेचा कळस 
15
Jalana: "भाजप प्रवेशाच्या निव्वळ अफवा"; राजेश टोपेंनी चर्चांना दिला पूर्णविराम
16
कथावाचक प्रदीम मिश्रा यांच्या कुबेरेश्वर धाममध्ये चेंगराचेंगरी, २ महिलांचा मृत्यू, अनेकजण जखमी   
17
Satyapal Malik Death: जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
18
Thane: ठाण्यातील प्रतिष्ठित शाळेत ४ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, पालकांच्या आरोपानंतर तपास सुरू
19
दरवर्षी मान्सून येताच लखपती बनतात इथले लोक; आंध्र प्रदेशच्या २ जिल्ह्यातील लोकांचं नशीब बदलतं
20
Satyapal Malik: 'मला सत्य सांगायचे आहे', शेवटच्या पोस्टमध्ये काय म्हणाले होते सत्यपाल मलिक?

‘दरडीं’ची गोष्ट मोठी ... ‘सरी’ कथा मात्र अधुरी!

By admin | Updated: September 15, 2014 23:25 IST

महाबळेश्वर : सरासरीपेक्षा पर्जन्यमान कमी; परतीच्या पावसावरच मदार

सचिन काकडे - सातारा -महाराष्ट्राची चेरापुंजी असणाऱ्या महाबळेश्वरमध्ये यंदा जरी समाधानकारक पाऊस झाला असला तरी पावसाने वार्षिक सरासरी अद्याप गाठली नाही. गेल्या वर्षी तालुक्यात एकूण २५३ इंच (६४०० मिलीमीटर) पाऊस पडला होता; मात्र यावर्षी आजअखेर केवळ २१४ इंच पावसाची नोंद झाली आहे.महाबळेश्वरला दरवर्षी सुमारे २६० ते २७० इंच पाऊस पडतो. यावर्षी जून महिला कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली. पाऊस वेळेवर न आल्याने महाबळेश्वरवर पाणीटंचाईचे संकट कोसळले होते. उशिरा पाऊस सुरू झाल्याने शेतीसह बऱ्याच घटकांवर याचा परिणाम झाला. यानंतर मात्र जुलै-आॅगस्टमध्ये तालुक्याला पावसाने झोडपून काढले. संपूर्ण जून महिन्यात केवळ ३०० मिलीमीटर तर जुलै-आॅगस्ट या दोन महिन्यांमध्ये महाबळेश्वरात ५००० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. असे असले तरी अजून महाबळेश्वरच्या पावसाने वार्षिक सरासरी गाठली नाही. गेल्यावर्षी १५ सप्टेंबरपर्यंत २४३ इंच (६१६३ मिलीमीटर) पावसाची नोंद झाली होती. तर यावर्षी १५ सप्टेंबर अखेर २१४ इंच (५४४२ मिलीमीटर) इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गेल्यावर्षी पडलेल्या पावसाचा पल्ला गाठण्यासाठी अजूनही ३९ इंच म्हणजेच सुमारे १००० मिलीमीटर इतक्या पावसाची आवश्यकता आहे. सध्या महाबळेश्वरात पावसाने दडी दिली असून, ऊन पडत आहे. परतीचा पाऊस झाला तरच पाऊस सरासरी गाठू शकतो. ‘दरडीं’ची धास्ती अधिक यंदा सरासरी न गाठताही महाबळेश्वरला झालेल्या मुसळधार पावसामुळे पहिल्यांदाच ‘दरडी’सत्र सुरू झाल्याने याचा पर्यटनावर परिणाम झाला.महाबळेश्वरकडे येणाऱ्या अंबेनळी घाटात एकदा, पसरणी घाटात तीनवेळा तर केळघर घाटात दोनवेळा मोठ्या दरडी कोसळल्या. तिन्ही घाटांत दरडी कोसळण्याची गेल्या २०-२५ वर्षांतील ही पहिलीच घटना होती. ऊन-पावसाचा खेळ...महाबळेश्वर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे मुख्य केंद्र आहे. दरवर्षी लाखो देशी-विदेशी पर्यटक महाबळेश्वरला भेट देतात. सध्या महाबळेश्वरात येणाऱ्या पर्यटकांची संख्या जरी अत्यल्प असली तरी बारमाही हंगाम असल्याने विकेंडला येथे पर्यटकांची गर्दी होत आहे. पावसाने उघडीप दिल्याने या ठिकाणी सध्या ऊन-पावसाचा खेळ पाहावयास मिळत आहे.