शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

बिनविरोधचा डंका; पण दुरंगीचाही दणका!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:04 IST

पाटण : तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यातच अनेक गावांनी ग्रामपंचायत बिनविरोध करून एक वेगळा आदर्श घालून दिला ...

पाटण : तालुक्यातील १०७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या. त्यातच अनेक गावांनी ग्रामपंचायत बिनविरोध करून एक वेगळा आदर्श घालून दिला आहे. मात्र, काही गावांमध्ये अटीतटीचा संघर्ष होणार, हे निश्चित आहे.

दरम्यान, मोठ्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे प्रयत्न असफल झाले आहेत. कारण एका वॉर्डातील मिटले तर दुसऱ्या वॉर्डमध्ये पेटतय, अशी परिस्थिती आहे. त्यामुळे अनेक गावांमध्ये निवडणूक होणारच हे स्पष्ट झाले आहे.

उमेदवारी अर्जांच्या माघारीनंतर स्पष्ट झालेल्या स्थितीनुसार पाटण तालुक्यात मंत्री शंभूराज देसाई विरुद्ध माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांच्या दोन गटात मुख्य लढत होणार, हे स्पष्ट दिसत आहे. त्यामध्ये कोयना विभागातील नानेल, नेचल, मेंढेघर, हुबरळी, कामरगाव या गावांमध्ये अटीतटीच्या लढती होतील, अशी चिन्हे आहेत. मोरणा विभागातील अनेक गावांनी बिनविरोध ग्रामपंचायत करून एक आदर्श समोर ठेवला आहे. मात्र, कोकिसरे, वाडीकोतावडे, धावडे, काहीर, पेठशिवापूर, गोकुळ तर्फ पाटण या गावांनी बिनविरोधचे नावही घेतले नाही.

तारळे विभागातही देसाई आणि पाटणकर गटात अटीतटीच्या लढती होतील, असे दिसत आहे. यामध्ये सर्वात मोठे गाव तारळे असून येथे सतरा जागांसाठी ५३ जणांनी उमेदवारी अर्ज भरले. तसेच या विभागातील मुरुड, मालोशी, बांबवडे, आंबळे, दुसाळे या गावांमध्ये जोरदार लढत होण्याची चिन्हे आहेत. ढेबेवाडी विभागातील मानेवाडी, खळे, कुंभारगाव, चिखलेवाडी, करपेवाडी, काळगाव, मोरेवाडी, कुठरे आदी गावांमध्ये जोरदार लढती होणार आहेत. मात्र, याच विभागातील पाळशी, तामिणे, सळवे, सातर या गावांनी बिनविरोधचा आदर्श निर्माण केला आहे. कुंभारगाव येथे ११ जागांसाठी लक्षवेधी लढती होणार आहेत. हे गाव माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे आहे.

चाफोली विभागातील बोंद्री, कातवडी, चिटेघर येथेही संघर्ष होणार आहे. चाफळ विभागात केळोली येथे अटीतटीची लढत आहे. इतर ग्रामपंचायतींमध्ये मात्र अंशत: निवडणुका होणार असे दिसते. मणदुरे विभागातील मणदुरे, मेंढोशी, साखरी, दिवशी खुर्द या गावांमध्ये मोठ्या निवडणुका अपेक्षित आहेत.

मल्हारपेठ विभागातील बोडकेवाडी, ठोमसे, नाडोली येथे मोठ्या लढती होणार असे दिसते. मरळी विभागातील शिंदेवाडी, सुळेवाडी, चोपदारवाडी, सोनावडे, त्रिपुडी, चोपडी, पापर्डे, सांगवड आदी ठिकाणी धुमशान होणार आहे.

- चौकट

... या ग्रामपंचायती झाल्या बिनविरोध

उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये जेवढ्या जागा तेवढेच उमेदवार शिल्लक राहिल्यामुळे अर्ज माघारी घेण्यापूर्वीच काही गावांनी बिनविरोधचा आदर्श निर्माण केला. त्यामध्ये गोषटवाडी, आंबेघर तर्फ मरळी, पाचगणी, आटोली, नेरले, डांगीस्टेवाडी, सुरुल, खोणोली, वाघजाईवाडी, अंब्रुळे, कोदळ, दिवशी बुद्रुक, जरेवाडी, चाफोली, तामिणे, पाळशी, सळवे, कोळेकरवाडी, सातर, पाचपुतेवाडी, चव्हाणवाडी, मस्करवाडी या ग्रामपंचायती बिनविरोध झाल्यात जमा आहेत.