शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

ढेबेवाडी मार्गावर धोकादायक वळण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:14 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणांपैकी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

कुसूर : मलकापूर येथील ढेबेवाडी फाट्यापासून ते ढेबेवाडीपर्यंतच्या मार्गावर अनेक ठिकाणी धोकादायक वळणे आहेत. या वळणांपैकी शिंदेवाडी येथील वळण जास्त धोकादायक असल्याने याठिकाणी रात्री अपघात होत आहेत. या वळणावर भरधाव वेगातील वाहनांच्या चालकांचा ताबा सुटून वाहने नजिकच्या ओढ्यात जात आहेत. याठिकाणी दिशादर्शक व सूचना फलक नाहीत. हे फलक लावण्यात आले नसल्याने रात्री दुचाकी वाहनांमध्ये अपघात होत आहे.

सैदापूर ते ओगलेवाडी रस्त्याची मोठी दुरवस्था

कऱ्हाड : कऱ्हाड ते विटा मार्गावरील सैदापूरमधील कृष्णा कॅनॉल ते ओगलेवाडी या दरम्यान रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघातांचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही दिवसांपूर्वी कृष्णा पुलावरील रस्त्याची डागडुजी करण्यात आली. मात्र, तेथून पुढे रस्त्याच्या दुरवस्थेकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.

गटारामधील कचरा पसरतोय उपमार्गावर

कऱ्हाड : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची सध्या मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या नाल्यामध्ये कचरा साचून राहिल्यामुळे त्यातील पाणी व कचरा महामार्गालगतच्या उपमार्गावर येत आहे. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. या उपमार्गावरून दुचाकीस्वारांना जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. कऱ्हाडपासून सातारा - सांगली जिल्ह्यांच्या हद्दीपर्यंत राष्ट्रीय महामार्गानजीकच्या गटाराची ठिकठिकाणी अशी दुरवस्था झाली असून, त्याकडे संबंधित विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. मलकापूर, नांदलापूर, पाचवड फाटा, आटके, नारायणवाडी, वाठार, मालखेड याठिकाणी गटारात कचरा साचत आहे.

ढेबेवाडी मार्गावर प्रवासी थांबा शेड उभारणे गरजेचे

कऱ्हाड : तालुक्यात कऱ्हाड - ढेबेवाडी मार्ग ते कऱ्हाड - पाटण मार्गावर रस्ता रुंदीकरणाच्या कामात संबंधित विभागाने एस. टी. थांबा प्रवासी शेड हटविल्या आहेत. पावसाळ्यात विद्यार्थी व नागरिकांना उघड्यावर उभे राहून एस. टी.ची प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यामुळे ज्याठिकाणी प्रवासी शेड हटविण्यात आल्या आहेत, त्याठिकाणी तत्काळ शेड उभारण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

उंडाळे विभागातील तुळसण मार्गावर खड्डे

उंडाळे : उंडाळे विभागातील उंडाळे ते तुळसण फाटा या मार्गाची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून, पाईपलाईनसाठी रस्त्यामध्ये चर काढण्यात आला आहे. मात्र, त्यानंतरही बांधकाम विभागाकडून रस्त्याची दुरूस्ती करण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. त्यामुळेच या मार्गावरील वाहतूक धोकादायक बनली आहे. उंडाळे ते तुळसण फाटा हा रस्ता शेतकऱ्यांनी आपली जमीन देऊन केला आहे. सध्या उंडाळे ते तुळसण फाटा दरम्यान मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्याच्या कडेने झाडेझुडपे वाढली आहेत. या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याची मागणी होत आहे.

कऱ्हाडला बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये हरित शपथ

कऱ्हाड : स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालयात ‘माझी वसुंधरा’ कार्यक्रम घेण्यात आला. त्याअंतर्गत विद्यार्थी व प्राध्यापकांना हरित शपथ देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. सतीश घाटगे होते. प्राचार्य घाटगे यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासाबरोबर पर्यावरणाचे संवर्धन होणे ही काळाची गरज असल्याचे सांगून या अभियानाच्या माध्यमातून पर्यावरणाचे रक्षण कसे करता येईल, याविषयी विचार मांडले.