कऱ्हाड ते चांदोली मार्गाचे रुंदीकरण गत दोन वर्षांपासून सुरू आहे. रुंदीकरणावेळी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड करण्यात आली आहे. रस्त्यालगतचे काही जुने वृक्ष रूंदीकरणातून वाचले आहेत. मात्र यापैकीच काही वृक्षांच्या मुळ्या तोडून रस्त्यालगत नाला तयार करण्यात आला आहे. त्यामुळे हे वृक्ष धोकादायक बनले असून, अशा वृक्षांपैकीच एक वृक्ष धोंडेवाडी फाटा येथे आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थांची वर्दळ असते. त्याचबरोबर मार्गावरून दररोज हजारो वाहने ये-जा करीत असतात. या परिसरात एक मंगल कार्यालय तसेच हॉटेल असून, याठिकाणी वाहने पार्क केली जातात. लग्नसराईवेळी आणि रात्रीच्यावेळी जेवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ याठिकाणी उपस्थित असतात. त्यामुळे धोकादायक बनलेला वृक्ष पडून दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने धोकादायक वृक्ष हटविण्याची मागणी केली जात आहे.
धोकादायक वृक्षामुळे जीव टांगणीला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:23 IST