शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कापड व्यावसायिकाच्या घरात कामगारानेच मारला डल्ला; आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

By दत्ता यादव | Updated: May 27, 2024 19:57 IST

अवघ्या १८ तासांत गुन्हा उघडकीस; आठ लाखांचा मुद्देमाल हस्तगत

सातारा : शहरातील कापड व्यावसायिक राजकुमार उधानी यांच्या घरात त्यांच्याच दुकानात काम करत असलेल्या कामगाराने आठ  लाख ८० हजारांच्या ऐवजावर डल्ला मारला. मात्र, अवघ्या १८ तासांत शाहूपुरी पोलिस ठाण्यातील गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणून कामगाराला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून चोरीचा मुद्देमालही हस्तगत करण्यात आला.

आदित्य सुभाष कापसे (वय १९, रा. शुक्रवार पेठ, सातारा) असे अटक करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, राजकुमार उधानी (वय ५९, रा. शुक्रवार पेठ, सातारा) यांचे साताऱ्यात कापड दुकान आहे. या दुकानात आदित्य कापसे हा गेल्या तीन वर्षांपासून काम करत आहे. दरम्यान, कास येथे दि. २५ रोजी दुपारी एका काैटुंबिक कार्यक्रमाला उधानी कुटुंबीय गेले होते. ही संधी साधून दुकानातील कामगार आदित्य याने रात्री साडेसात वाजता मुख्य दरवाजाचे कुलून तोडून त्यांच्या घरात प्रवेश केला. 

बेडरुममधील लाकडी कपाटातील ड्राॅव्हरमधून १४ तोळ्यांचे सोन्याचे दागिने, ९६ हजारांची रोकड असा सुमारे आठ लाख ८० हजारांचा ऐवज चोरून नेला. या घटनेची शाहूपुरी पोलिस ठाण्यात नोंद झाल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. ही चोरी दुकानातील कामगार आदित्य कापसे याने केल्याची माहिती खबऱ्याकडून पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी दुसऱ्या दिवशी सकाळी आदित्य याला ताब्यात घेतले.

पोलिसांनी त्याच्याकडे कसून चाैकशी केल्यानंतर त्याने चाेरीची कबुली दिली. त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेले दागिने आणि पैसे त्याने पोलिसांना काढून दिले. यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली. शाहूपुरी पोलिस ठाण्यात त्याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  पोलिस निरीक्षक राजेंद्र सावंत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कुमार ढेरे, अंमलदार सुरेश घोडके, मनोज मदने, नीलेश काटकर, महेश बनकर, अभय साबळे, सचिन पवार, स्वप्नील सावंत आदींनी या कारवाईत भाग घेतला.

म्हणे पगार कमी म्हणून केली चोरी...आदित्य कापसे याच्याकडे पोलिसांनी कसून चाैकशी केल्यानंतर त्याने पगार कमी असल्यामुळे मालकाच्या घरात चोरी केल्याचे पोलिसांना सांगितले. मात्र, महिन्याला त्याला दहा हजार रुपये पगार होता, असे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :satara-pcसाताराtheftचोरी