शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: ठाकरे बंधूंचा 'विजयी मेळावा'! उद्धव आणि राज सभास्थळी दाखल
2
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
3
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
4
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
5
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
6
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
7
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
8
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
9
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
10
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
11
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
12
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
13
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे
14
नवऱ्याने भरपूर त्रास दिला, पण बॉयफ्रेंड त्यापेक्षा भयंकर निघाला! ४ वर्षांच्या मुलानं सांगितलं आईसोबत काय घडलं...
15
ट्रेनमध्ये ८० रुपये आणि स्टेशनवर ७० रुपयांत मिळणार व्हेज जेवण; रेल्वे मंत्रालयानं शेअर केला संपूर्ण मेन्यू
16
भूखंड घोटाळा : एक अधिकारी निलंबित, ८ जणांची चौकशी; मालेगाव येथील प्रकार; दोघा स्टॅम्प व्हेंडरवरही फौजदारी कारवाई
17
Gold Price Today : आनंदाची बातमी! ...तर सोन्याच्या किंमती कमी होणार?, अर्थतज्ज्ञांनी कारण सांगितलं
18
"त्याच्यासोबतचं माझं नातं…’’,अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेचा धक्कादायक दावा
19
Maharashtra Weather: मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस कोसळणार; रत्नागिरी, रायगडसह 'या' जिल्ह्यांना आज ऑरेंज अलर्ट
20
SIP: केवळ २.४० लाखांची गुंतवणूक आणि ₹४६.५६ लाखांचं व्याज; ही आहे कम्पाऊंडिंगची ताकद, कशी होईल ही कमाल?

दत्तगुरुंसमोर खाकी नतमस्तक !

By admin | Updated: December 9, 2014 00:29 IST

भाविकांची गर्दी : पोलीस दूरक्षेत्र आवारात दत्त जयंती साजरी

मल्हारपेठ : मल्हारपेठ येथे पोलीस दूर क्षेत्राच्या आवारात दत्त जयंती सोहळा प्रतिवर्षाप्रमाणे मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला. महिला भाविकांच्या उपस्थितीत दत्त जन्म सोहळ्यास मोठी गर्दी करून भक्तगण जमला होता.पाटण तालुक्यातील मल्हारपेठ पोलीस दूरक्षेत्र आवारात दत्त मंदिर स्थापन केले आहे. गेल्या १५ वर्षांपासून या दत्तमंदिरात सर्व ग्रामस्थ मोठ्या भक्तीभावाने पूजा करून देवदर्शनासाठी येतात. दत्तजयंतीनिमित्त सर्व ग्रामस्थ, व्यापारी, पोलीस कर्मचारी, दत्त जन्म सोहळा साजरा करतात. त्याप्रमाणे काल नुकतीच दत्तजयंती साजरी करण्यात आली. सकाळपासून दत्तमंदिरात अभिषेक, पूजा, आरती, दिवसभर भजनांचा कार्यक्रम होऊन सायंकाळी दत्त जन्म सोहळा महिलांनी पाळणा म्हणून व अशोक स्वामी यांनी मंत्रपठण, दत्तआरतीनंतर जन्मसोहळा साजरा केला.देवदर्शनासाठी लांब रांगा लागल्या होत्या. या कार्यक्रमास पोलीस उपअधीक्षक मितेश घट्टे, पोलीस निरीक्षक विकास धस व अधिकारी यांनी भेट देऊन देवदर्शन घेतले. उपस्थित भक्तगणांचे स्वागत सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड, पोलीस हवालदार सतीश जाधव, प्रवीण काटवटे, सचिन पाटील, अनिता शेंडगे यांनी केले.दत्त जयंती निमित्त आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमास मल्हारपेठ व परिसरातील भक्तगणांनी उपस्थिती लावून महाप्रसादाचा लाभ घेतला. (वार्ताहर)