शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

रोज सव्वादोन कोटींचं पेट्रोल खपेना ! जिल्ह्यात रोज अडीच लाख लिटर पेट्रोलचा व्यवसाय बुडाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2018 01:26 IST

जगदीश कोष्टी ।सातारा : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत चालल्यामुळं बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचं प्रमाण कमी केलंय. जिल्ह्यातील २३० पेट्रोलपंप चालकांना याचा फटका बसला असून पंपांवर सरासरी एक लाखाची उलाढाल कमी झालीय. याचाच अर्थ जिल्ह्यातील पंपचालकांना रोज सुमारे २ कोटी ३० लाख रुपयांचा फटका बसू लागलाय.देशभरात सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ ...

ठळक मुद्देदररोजच्या दरवाढीमुळे सामान्य ग्राहकांची पेट्रोल पंपांकडे पाठ

जगदीश कोष्टी ।सातारा : पेट्रोल-डिझेलचे दर दररोज वाढत चालल्यामुळं बहुतांश नागरिकांनी गाड्या वापरण्याचं प्रमाण कमी केलंय. जिल्ह्यातील २३० पेट्रोलपंप चालकांना याचा फटका बसला असून पंपांवर सरासरी एक लाखाची उलाढाल कमी झालीय. याचाच अर्थ जिल्ह्यातील पंपचालकांना रोज सुमारे २ कोटी ३० लाख रुपयांचा फटका बसू लागलाय.

देशभरात सध्या पेट्रोल-डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जिल्ह््यातील दुचाकीस्वारांची शंभर तर चारचाकी चालकांची पाचशे रुपयांचे पेट्रोल भरण्याची पूर्वीपासूनच मानसिकता आहे. पूर्वी शंभर रुपयांचे पेट्रोल भरले तर १.२२ लिटर पेट्रोल येत होते. ते आता १.०६ लिटर मिळते. साधारणपणे चार दिवस पुरणारे पेट्रोल आता दोन दिवसांत संपत आहे. त्यामुळे ग्राहकांना पेट्रोलचा झटका बसायला लागला आहे. अत्यावश्यक काम असेल तरच गाडीचा वापर केला जात आहे.

एरवी सर्वच पेट्रोल पंपांवर वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत होत्या. त्या पंपावर केव्हातरी एखादी गाडी येत आहे. इतर वेळेस सर्व कामगार निवांत बसलेलेच पाहायला मिळतात.सातारा शहरात आठ तर जिल्ह्यात २३० पेट्रोलपंप आहेत. ग्रामीण भागातील पेट्रोल पंपावर दररोज कमीतकमी साडेतीन ते चार लाख तर शहरी भागात दहा ते बारा लाखांची उलाढाल होते. दरवाढीमुळे उलाढालीवर सरासरी तीस टक्क्याने घसरण झाली आहे. त्यामुळे प्रत्येक पंपचालकाचा सरासरी एक लाखाचा व्यवसाय बुडाला. जिल्ह्यातील २३० पंपांचा विचार केला तर हा आकडा २ कोटी ३० लाखांच्या घरात जातो. तसेच पेट्रोल पंपावर अवलंबून असलेल्या व्यावसायावरही परिणाम होत आहे. पंपावर हवा भरण्यासाठी येणाऱ्या वाहनांचे प्रमाणही कमी झाले आहे. त्यामुळे कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे.स्वत:ची गाडी घरी ठेवून माझी गाडी घेऊन जाण्याची आता सवयच लागली आहे. मीही कोणाला न दुखवता चावी देत होतो; आता पेट्रोलचे दर वाढले असल्याने मीच गाडीचा वापर कमी करतो. पण आता कोण गाडी मागायला आला तर स्पष्ट सांगतो, ‘दहा रुपये घेऊन रिक्षाने जा; पण गाडी सोडून बोल.- चेतन चवरे, सातारा. 

मी कॉलेजला जाण्यासाठी, पाहुणे-मैत्रिणींकडे जाण्यासाठी गाडीचा वापर करत होते; पण दरवाढ होऊ लागली. त्यामुळे यापुढे एसटीनेच कॉलेज जात होते आता सुट्या असल्या तरी यापुढेही एसटीनेच जाण्याचा संकल्प केला आहे.- जागृती साबळे, शिवथरपेट्रोल-डिझेलच्या किमती दिवसेंदिवस वाढत आहेत. या बदलाला सामोरे जाता सुज्ञ ग्राहक व पंपचालकांनी अभ्यासपूर्वक सामोरे जाण्याची गरज आहे.- रितेश रावखंडे, सचिव,सातारा जिल्हा पेट्रोलियम डिलर्स, असोसिएशन, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPetrol Pumpपेट्रोल पंप