शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

तलवारीने केक कापणे भोवले! गुन्हा दाखल : रस्त्यावर वाढदिवस; विद्रूपीकरणाचाही आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2017 01:03 IST

कºहाड : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे फॅड शहरात निर्माण झाले असताना ग्रामीण भागातही त्याचे लोण पोहोचले आहे. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड येथेही मंगळवारी रात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करून तलवारीने केक कापण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे.अखिल अशोकराव मोहिते (रा. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड) असे गुन्हा दाखल ...

कºहाड : रस्त्यावर वाढदिवस साजरा करण्याचे फॅड शहरात निर्माण झाले असताना ग्रामीण भागातही त्याचे लोण पोहोचले आहे. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड येथेही मंगळवारी रात्री रस्त्यावर वाढदिवस साजरा करून तलवारीने केक कापण्यात आला. याप्रकरणी पोलिसांनी एका युवकावर गुन्हा दाखल केला आहे.अखिल अशोकराव मोहिते (रा. रेठरे बुद्रुक, ता. कºहाड) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रेठरे बुद्रुक येथील अखिल अशोकराव मोहिते याचा मंगळवारी वाढदिवस होता. वाढदिवसानिमित्त गावात

मोठ्या प्रमाणावर शुभेच्छा फलक लावण्यात आले होते. मंगळवारी रात्री गावातील विकास सेवा सोसायटीच्या चौकात स्पीकर लावून वाढदिवस साजरा करण्याचे सुरू होते.अखिलच्या हातात ३० ते ३५ इंच लांबीची तलवार होती. हा प्रकार पोलिस उपअधीक्षक नवनाथ ढवळे यांना समजला. उपअधीक्षक ढवळे यांनी याबाबत तालुका पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक क्षीरसागर यांना खात्री करून कारवाई करण्याची सूचना केली. त्यानुसार पोलिस निरीक्षक क्षीरसागर यांनी तत्काळ रेठरे बुद्रुक येथे पोलिस कर्मचाºयांना पाठवले.

पोलिस कर्मचारी गावात पोहोचले त्यावेळी मुख्य चौकात मोठ्या आवाजात स्पीकरलावून अखिल मोहिते हा हातात तलवार घेऊन केक कापत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

पोलिसांनी अखिल मोहिते याच्याविरोधात कारवाई करत बेकायदा शस्त्र जवळ बाळगणे, स्पीकर लावून सार्वजनिक शांततेचा भंग करणे, चौकात वाढदिवसाचे फलक लावून विद्रुपीकरण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.कॉलेजच्या वीस युवकांवर कारवाई महाविद्यालय परिसरात रस्त्यावर दुचाकी उभ्या करून त्यावर केक कापण्याचा प्रकार युवकांकडून केला जातो. काही दिवसांपूर्वीही असाच प्रकार घडला होता. त्यावेळी रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी पोलिसांनी बर्थ डे बॉयसह वीसजणांवर कारवाई केली होती. त्यानंतर रेठरे बुद्रुकमध्ये कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.