शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Satara- घडतंय बिघडतंय: ..आता मंत्री देसाई काय बोलणार याचीच उत्सुकता!

By प्रमोद सुकरे | Updated: June 13, 2025 12:43 IST

राजकीय भूकंपानंतरही 'शंभूराजां'चे मौन

प्रमोद सुकरेकऱ्हाड: पाटणचे युवा नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर शिंदे सेनेच्या तालुकाध्यक्षांनी थेट पाटणकरांची उंचीच काढली तर उध्दव सेनेच्या हर्षद कदमांनी देसाईंनी पाटणकरांबाबतची भूमिका स्पष्ट करावी असे आव्हान दिले.भरीत भर म्हणून सत्यजितसिंह पाटणकरांनी आमचा प्रवेश सुरत, गुवाहाटी मार्गे झालेला नाही असा देसाईंना थेट टोला लगावला.दुसरीकडे मंत्री देसाईंना मुंबईत माध्यम प्रतिनिधींनी सत्यजितसिंह पाटणकरांच्या प्रवेशाबाबत छेडले असता मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर अगोदर बोलणार आहे अशी प्रतिक्रिया देणे पसंद केले. त्यामुळे आता मंत्री देसाई त्या दोघांशी अन विरोधकांनी केलेल्या टिकेबाबत नेमके काय बोलणार? याबाबत साऱ्यांनाच उत्सुकता लागून राहिली आहे.

महाराष्ट्राची वरदायिनी असलेल्या कोयना धरणाच्या परिसरातच पाटण तालुका वसला आहे. त्यामुळे येथील जनतेला नैसर्गिक भूकंपाच्या धक्क्यांची सवयच झाली आहे. पण आता या तालुक्यात राजकीय भूकंपही सुरू झाले आहेत. त्याचाच भाग म्हणून शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सत्यजितसिंह पाटणकर व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हिंदुराव पाटील यांनी नुकताच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या भूकंपा नंतरच्या हालचाली मतदारसंघात दिसू लागल्या आहेत .अनेकांच्या त्याबाबत प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

पाटण तालुका शिंदेसेनेच्या अध्यक्षांनी शरद पवारांचे निष्ठावंत म्हणवून घेणाऱ्या पाटणकरांनी अडचणीच्या काळात त्यांची साथ सोडली. हीच त्यांची निष्ठा का? असा चिमटा काढला. तर शंभुराजांच्या पक्ष प्रवेशाला स्वतः बाळासाहेब ठाकरे लाल दिव्याची गाडी घेऊन मरळीला आले होते. तुम्हाला मुंबईला जाऊन मोजक्या लोकांच्यात प्रवेश करावा लागला. त्याला कोणी मोठे नेते नव्हते. यावरून तुमची उंची समजते असा टोला लगावला.

वाचा- ..तर ३५ हजार मतांनी त्यांची रिक्षा पलटी केली नसती, शंभूराज यांचा पाटणकरांना टोला  

यावर स्वतः सत्यजितसिंह पाटणकर यांनी आमचा भाजप प्रवेश सुरत, गुहाटी मार्गे झालेला नाही. तुम्ही ज्या नेत्यांचे नाव घेता त्यांच्याशी व त्यांच्या मुलाशी प्रामाणिक राहिला का? हे तपासा असा उपरोधिक टोला लगावला. त्यामुळे गत २ दिवसात पाटण तालुक्यातील राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे.

अचूक टायमिंग साधलेदेसाई - पाटणकर गटात सुरू असलेला कलगीतुरा लक्षात घेऊन उध्दव सेनेचे जिल्हाध्यक्ष हर्षद कदम यांनी अचूक टायमिंग साधले.पालकमंत्री देसाईंनी आता पाटणकरांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी. तुम्हाला विचारात घेऊनच तुमचे मित्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाटणकरांना भाजपमध्ये पक्षप्रवेश दिला असेल असा चिमटा त्यांनी काढलाय.

राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी मंत्री देसाईंचे असलेले मैत्रीपूर्ण संबंध, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असणारी जवळीक संपूर्ण जिल्ह्याला माहित आहे. पाटणकर यांच्या भाजप प्रवेशाबाबत त्या दोघांशी बोलणार असल्याचे देसाईंनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांच्यात नेमके काय बोलणे होणार? याबाबत राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरू आहेत.