शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

सातारा: सुपनेत ऊसतोड करताना आढळली रानमांजराची पिल्ले!, बिबट्याच्या वावरामुळे गावात भीतीचे वातावरण

By संजय पाटील | Updated: November 15, 2022 13:44 IST

कऱ्हाड : तालुक्यातील सुपने येथे भागवत नावच्या शिवारात उसाच्या शेतात वन्यप्राण्याची पाच पिल्ले आढळून आली. उसाची तोड सुरू असताना ...

कऱ्हाड : तालुक्यातील सुपने येथे भागवत नावच्या शिवारात उसाच्या शेतात वन्यप्राण्याची पाच पिल्ले आढळून आली. उसाची तोड सुरू असताना मजुरांना ही पिले आढळली. पिल्ले बिबट्याची असावीत, असा समज झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले.दरम्यान, घटनेची माहिती मिळाल्यानंतर प्राणी मित्रांसह वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी त्याठिकाणी भेट देऊन पाहणी केली. त्यावेळी पिल्ले बिबट्याची नसून रानमांजराची असल्याचे स्पष्ट झाले. त्या पिलांना सुरक्षितस्थळी नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.सुपने परिसरात बिबट्याचा वावर असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये अगोदरच भीतीचे वातावरण आहे. गावाच्या शिवारात वारंवार बिबट्याचे दर्शन होत आहे. तसेच त्याने अनेक पाळीव प्राण्यांवरही हल्ले केले आहेत. त्यामुळे ग्रामस्थ बिबट्याच्या दहशतीखाली आहेत. त्यातच भागवत नावाच्या शिवारात ऊसतोड सुरू असताना मजुरांना वन्य प्राण्यांची काही पिले आढळून आली. संबंधित पिले नवजात होती. त्यांचे डोळेही उघडले नव्हते.ही पिल्ले बिबट्याची असावीत, असा समज झाल्यामुळे मजुरांनी ऊसतोड बंद केली. तसेच सर्वजण तेथून निघून गेले. बिबट्याचे पिल्ले आढळल्याची अफवा पसरल्यामुळे गावात भीती आणखी वाढली होती. मात्र, ती पिल्ले बिबट्याची नसून रानमांजराची असल्याचे वन विभागाने पाहणीनंतर स्पष्ट केले. तसेच बिबट्या अथवा त्याची पिल्ले आढळल्यास ग्रामस्थांनी घाबरून न जाता वन विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन वन विभागाने केले.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरforest departmentवनविभाग