शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

थंडी अन् करपाचा हळद पिकाला फटका : शेतकरी चिंताग्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 00:11 IST

वाई तालुक्यातील बावधनसह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, कमी पर्जन्यमान, थंडी, ढगाळ वातावरण अन् करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा या पिकाला फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली

ठळक मुद्देबावधन परिसरात काढणीची लगबग; पण उत्पादन घटण्याची चिन्हे-पिवळं सोनं - १

तानाजी कचरे।बावधन : वाई तालुक्यातील बावधनसह परिसरात यंदा मोठ्या प्रमाणात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. मात्र, कमी पर्जन्यमान, थंडी, ढगाळ वातावरण अन् करपा रोगाच्या प्रादुर्भावाचा या पिकाला फटका बसण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. सध्या हळद काढणीची कामे जोमाने सुरू असली तरी पिकाला अपेक्षित दर मिळेल की नाही? या विवंचनेत शेतकरी अडकला आहे.

बावधन परिसरात यंदा ३९० एकर क्षेत्रावर हळद पिकाची लागवड केली आहे. यापैकी १८० एकर विहीर पाण्यावर, १५५ एकर पाटपाणी तर ५५ एकर क्षेत्रातील हळद लागवड ठिबकवर करण्यात आली आहे. गेल्या वर्षी एप्रिल-मे महिन्यात हळदीची लागवड झाली. मात्र, पावसाने पाठ फिरविल्याने पिकाची पूर्ण वाढ झाली नाही. त्यातच नोव्हेंबर ते जानेवारीपर्यंत कडाक्याची थंडी पडल्याने पिकांवर मोठ्या प्रमाणात करपा रोगाचा प्रादुर्भाव झाला. या पिकाला पोषक असलेल्या वातावरणाची निर्मिती न झाल्याने यंदा हळद उत्पादनावर विपरित परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करीत आहेत.

हळदीला चांगला दर मिळेल, या आशेने अनेक शेतकऱ्यांनी हळदीचा साठा करून ठेवला आहे. परंतु यंदा अपेक्षित दर मिळण्याची खात्री नसल्याने शेतकºयांमध्ये भीतीचे वातावरण आहे. हळदीला यंदा प्रति क्विंटल १५ ते १७ हजार रुपये दर मिळाला तर उत्पादित खर्च जाऊन काही रक्कम शेतकºयाच्या खिशात पडू शकते. मात्र, दर कमी मिळाल्यास याचा मोठा फटका शेतकºयांना बसू शकतो.एकरी लाख रुपये खर्चएक एकर क्षेत्रात हळद लागवड करण्यासाठी शेतकºयांना सुमारे एक लाख रुपये खर्च येतो. नांगरट, कुळवणी, सरी यासाठी नऊ हजार रुपये, सेंद्रिय व रासायनिक खतांसाठी ३१ हजार रुपये, भिजवणी भर लावणे व भांगलणी मजुरी यासाठी २२ हजार रुपये तर पाला कापणी, हळद काढणे, ती शिजवणे व पॉलिश करणे यासाठी २३ हजार रुपये, हळद बियाणे १० हजार रुपये असा सुमारे एक लाख रुपये खर्च हळद लागवडीसाठी करावा लागतो. 

गेल्या काही वर्षांपासून उसाचे प्रश्न आंदोलनाद्वारे सोडविले जात आहेत. परंतु हळद पिकाला आधारभूत किंमत मिळत नाही. गेल्या वर्षी अपेक्षित दर न मिळाल्याने चार टनांहून अधिक हळद साठवून ठेवली आहे. त्यातच यंदा हळदीला पोषक वातावरण नसल्याने उत्पादनात घटण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.- देवराम ठोंबरे, शेतकरी