शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
3
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
4
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
5
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
6
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
7
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
8
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
9
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
10
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
11
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
12
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
13
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
14
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
15
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
16
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
17
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
18
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
19
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
20
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली

ठाण्यासमोर जमाव येताच युवकांना सोडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2018 23:28 IST

सातारा : सातारा शहरात बंदमुळे तणावपूर्ण वातावरण झाले होते. काही ठिकाणी वाहनांच्या काचा फोडल्या. ठिकठिकाणी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून वाहतूकही थांबविण्याचा प्रयत्न केला गेला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या सुटकेसाठी जमावाने शहर पोलिस ठाण्यासमोर गर्दी करून या ‘युवकांना सोडणार नसाल तर याद राखा’ असा इशारा दिला. ...

सातारा : सातारा शहरात बंदमुळे तणावपूर्ण वातावरण झाले होते. काही ठिकाणी वाहनांच्या काचा फोडल्या. ठिकठिकाणी रस्त्यावर गाड्या आडव्या लावून वाहतूकही थांबविण्याचा प्रयत्न केला गेला. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी काही युवकांना ताब्यात घेतले. मात्र, त्यांच्या सुटकेसाठी जमावाने शहर पोलिस ठाण्यासमोर गर्दी करून या ‘युवकांना सोडणार नसाल तर याद राखा’ असा इशारा दिला. या संशयितांना सोडल्यानंतर तणाव निवळला.आंदोलनामुळे सातारा शहरात सकाळपासून कार्यकर्ते पायी व दुचाकीवर फिरून दुकाने बंद करण्याचे आवाहन करत होते. त्यामुळे राजवाडा, पोवई नाका, सातारा बसस्थानक, भूविकास बँक, गोडोली, विसावा नाका आदी प्रमुख रस्त्यांवरील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली. सकाळी करंजे नाका परिसरात रिक्षाची वाहतूक थांबवून त्याची काच फोडली. त्यामुळे मोठी गर्दी जमली होती. याची माहिती मिळताच शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन जमाव पांगवला. तसेच काही युवकांना ताब्यात घेतले.दरम्यान, शहरातील निघालेली दुचाकी रॅली तेथे आली. त्यांनी युवकांना सोडावे, अशी मागणी केली. त्यास पोलिसांनी नकार दिल्याने पोलिस आणि जमावामध्ये बाचाबाची झाली. तसेच युवकांच्या नातेवाइकांनी अटकाव करण्याचा प्रयत्न केला. तरीही पोलिस त्यांना शाहुपूरी पोलिस ठाण्यात घेऊन गेले. त्यांच्यापाठोपाठ नातेवाइकांनी पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली. त्यानंतर युवकांना सोडा नाही तर आम्हालाही अटक करा, अशी मागणी केली. परिसरात तणाव निर्माण झाल्याने अखेर पोलिसांनी त्या युवकांना सोडले.दरम्यान, दुपारी महामार्गावरील देगावफाटा परिसरातील प्रिती हॉटेलच्या पार्किंगमधील एका कारवर दगडफेक करून काच फोडली गेली. यामुळे तणावाचे वातावरण पसरले. त्यावेळी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तीन युवकांना ताब्यात घेऊन जमाव पांगवला. या तिघांना शहर पोलिस ठाण्यात हजर केले असता येथेही जमावाने पोलिस ठाण्याबाहेर गर्दी केली.दरम्यान, काही संघटनांच्या पदाधिकाºयांनी पोलिसांना ‘या युवकांना सोडणार नसाल तर याद राखा’ असा इशारा दिला. यावेळी पोलिस व जमावामध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून युवकांना समज देवून सोडले.संदीप पाटीलदिवसभर आॅन फिल्डजिल्ह्यात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस अधीक्षक संदीप पाटील सकाळपासून सर्वत्र लक्ष ठेवून होते. सातारा शहरातील फिरून बंदोबस्त पाहिला. तसेच दिवसभरात सातत्याने वायरलेसवरून कर्मचाºयांना सूचना देत होते. सातारा शहरातील सर्व संवेदनशील ठिकाणी व प्रमुख चौकात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.साताºयात पोलिसांची रणनिती यशस्वीएखाद्या ठिकाणी काही घटना घडल्यास पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत होते. तातडीने कारवाई करून संशयिताला ताब्यात घेऊन जमाव पांगवण्याची रणनिती पोलिसांनी आखली होती. त्यामुळे सातारा शहरात अपवादात्मक ठिकाणी हिंसक घटना घडल्या..फक्त संबंधितांनाच ताब्यात घेण्याची सूचनाकोरेगाव-भीमा हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. त्यामुळे बुधवारी सातारा जिल्ह्यात सर्वत्र कडकडीत बंद पाळला गेला होता. दरम्यान, काही ठिकाणी तोडफोड झाल्यामुळे पोलिसांनी आक्रमक भूमिका घेतली होती. मात्र, वरिष्ठ पोलिस अधिकाºयांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून ‘हिंसाचाराला जबाबदार असणाºया मंडळींनाच केवळ ताब्यात घ्या. त्या ठिकाणी उपस्थित असणाºया बघ्यांना त्रास देऊ नका,’ अशा सूचनाही दिल्या होत्या.