शहरं
Join us  
Trending Stories
1
घातपात की आणखी काही? योगी आदित्यनाथांच्या दौऱ्यापूर्वी ५०० किलो स्फोटके सापडली; 20 किमीपर्यंत पेरली...
2
गोव्यात चाललेय काय? आरोग्य मंत्र्यांकडून सीएमओचे काल निलंबन, आज मुख्यमंत्र्यांनी केले रद्द
3
उद्धव ठाकरेंना जोरदार धक्का! ज्याच्यासाठी लोकसभेला काँग्रेसला नडले, त्यानेच साथ सोडली; चंद्रहार पाटलांचा रामराम  
4
Maharashtra Politics : "भाजप आणि निवडणूक आयोगाची मॅच फिक्सिंग...", नाना पटोलेंचा देवेंद्र फडणवीसांवर पलटवार
5
पाकिस्तान पुन्हा उघडा पडला! सॅटेलाईट फोटो सोबत छेडछाड केली, खोटे दावे केले
6
बीएसएनएलने आणला ऑपरेशन सिंदूर प्लॅन! रिचार्जची काही रक्कम सैन्याला देणार; ग्राहकांनाही डिस्काऊंट मिळणार...
7
जळगाव: लग्नाच्या वाढदिवसासाठी माहेरावरून आली अन् घरात पाय ठेवताच दिसला पतीचा मृतदेह
8
चांदीचा भाव विक्रमी उच्चांकावर; आठवड्यात ८,४०० रुपयांची वाढ; ३ टक्के जीएसटीसह १,०९,२८३ रुपये
9
Bhushi Dam Incident: पोहण्याच्या मोहाने घेतला जीव, भुशी डॅममध्ये बुडून दोन तरुणांचा मृत्यू
10
इंजिनिअरिंगच्या 'त्या' विद्यार्थिनीचा खून प्रेम प्रकरणातून, पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये काय? मित्राविरुद्ध गुन्हा दाखल
11
सासू-सासरे अन् पतीसह तिनं मुलांनाही सोडलं नाही! कुटुंबाला 'स्लो पॉयझन' देणाऱ्या महिलेची 'अशी' झाली पोलखोल
12
पहलगाम हल्ला : मेजर विनय नरवाल यांच्या पत्नीचा अश्लील AI व्हिडीओ व्हायरल; पिता-पूत्र ताब्यात
13
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
14
मुंबई: मेट्रोमोनियल साईटवर भेट, लग्नाचं स्वप्न दाखवून बलात्कार, पैसेही उकळले; आरोपीला न्यायालयाने काय दिली शिक्षा?
15
"कोरोनापेक्षाही वाईट परिस्थिती येईल...", चीनबद्दल डोनाल्ड ट्रम्प यांना तज्ज्ञांचा मोठा इशारा
16
IND vs ENG : इंग्लंडमध्ये पोहचताच टीम इंडियाचा कसून सराव; २२ वर्षांनी हा चेहरा पुन्हा संघासोबत दिसला
17
Viral Video : चोरी करायला गेला अन् पाय घसरून पडला! चोराची फजिती सीसीटीव्हीत झाली कैद
18
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
19
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा

‘वर्दी’साठी गर्दी!

By admin | Updated: June 7, 2014 00:04 IST

पोलीस भरती : हजारो अर्जांमधून जनतेच्या रक्षकांची निवडप्रक्रिया सुरू

सातारा : पोलिसी गणवेश अंगावर चढवून जनतेची सेवा करण्याची ऊर्मी असणाऱ्या हजारो युवकांमधून जनतेचे रक्षक निवडण्याच्या प्रक्रियेला शुक्रवारी उत्साही वातावरणात प्रारंंभ झाला. पोलीस दलात भरती होण्याची आकांक्षा घेऊन हजारो तरुण पोलीस कवायत मैदानात उपस्थित झाले होते. पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची प्रारंभिक चाचणी शुक्रवारी घेण्यात आली. पोलीस दलात तीनशे जागा भरावयाच्या असून, त्यासाठीची भरती प्रक्रिया शुक्रवारी सकाळी सुरू झाली. तीनशे जागांसाठी तब्बल ९ हजार ३८९ जणांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी दीड हजार उमेदवारांना पहिल्या दिवशी मैदानी चाचणीसाठी बोलाविण्यात आले होते. सकाळपासूनच पोलीस कवायत मैदानाचा परिसर तरुणांच्या गर्दीने फुलून गेला होता. भरती प्रक्रिया सुरू असताना पोलीस कवायत मैदानात उमेदवारांव्यतिरिक्त अन्य कोणालाही प्रवेश करू दिला जात नाही. त्यामुळे परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधीक्षक, अतिरिक्त पोलीस अधीक्षक तसेच ३४ पोलीस निरीक्षक, सहायक पोलीस निरीक्षक, सहायक फौजदारांची टीम २५० पोलीस कर्मचाऱ्यांसह मैदानावर उपस्थित होती. प्रत्येक मैदानी चाचणीसाठी स्वतंत्र गट करण्यात आले होते. प्रत्येक गटासाठी काही अधिकारी आणि कर्मचारी तैनात करण्यात आले होते. उमेदवारांची प्रथम शारीरिक चाचणी घेण्यात आली. त्यात छाती फुगवून आणि न फुगवता, तसेच उंची, वजन आदी बाबी तपासण्यात आल्या. त्यानंतर मैदानी चाचण्या घेण्यात आल्या. या चाचण्यांचे एकंदर चार प्रकार होते. या चाचण्यांमध्ये दीड हजारपैकी ७१८ जण पात्र ठरले आहेत. कागदपत्रांची पूर्तता आणि शारीरिक तसेच मैदानी चाचणीत २१९ उमेदवार अपात्र ठरले.दरम्यान, शुक्रवारी पात्र ठरलेल्या ७१८ उमेदवारांची पाच किलोमीटर धावण्याची चाचणी शनिवारी घेतली जाणार आहे. तसेच यादीतील पुढील दीड हजार जणांना प्राथमिक शारीरिक आणि मैदानी चाचणीसाठी शनिवारी बोलाविण्यात आले आहे. ही भरतीप्रक्रिया सुमारे दहा ते बारा दिवस चालण्याची अपेक्षा आहे. त्यानंतर पात्र उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध होणार असून, पोलीस दलात करिअर करण्यासाठी अनेक युवक आशा लावून बसले आहेत. (प्रतिनिधी)