शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण! सुदानमधील अल-फशीरमध्ये पॅरामिलिटरी फोर्सचा हल्ला, ६० हून अधिक लोकांचा मृत्यू
2
नोकरदारांनो, लक्ष द्या! आजपासून पहिली मेट्रो दीड तास उशिराने! मेट्रो २ अ, ७ मार्गिकेसाठी ७ दिवसांचे तात्पुरते वेळापत्रक
3
अमेरिका पुन्हा एकदा हादरली! मिसिसिपीमध्ये गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १२ जण जखमी
4
भारीच! "सणाच्या दिवशी काम नाही, फक्त आराम करा", 'या' कंपनीने दिवाळीला दिली ९ दिवस सुटी
5
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ ऑक्टोबर २०२५; शुभवार्ता समजणार, प्रतिष्ठा वाढणार, धनलाभ होणार
6
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींची दिवाळी गोड, शुभ-लाभ; सौभाग्य-संपन्नता, ३ राशींनी ‘हे’ टाळाच
7
चीनवर १०० टक्के  टॅरिफ, ट्रम्प यांनी दिली पुन्हा धमकी; जागतिक बाजारपेठेत पुन्हा मंदीची शक्यता
8
जागतिक अस्थिरतेने गुंतवणूकदार मालामाल! गेल्या चार वर्षांत किती वाढले सोने-चांदीचे भाव? जाणून डोळे फिरतील
9
उद्धवसेनेच्या हंबरडा मोर्चाने छत्रपती संभाजीनगर दणाणले;  शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी १ लाख रुपये द्या - उद्धव ठाकरे
10
ट्रम्प यांचा चीनवर टॅरिफ बॉम्ब; धमकीनंतर कोसळला बाजार; अमेरिकेच्या शेअर बाजारात एप्रिलनंतरची मोठी घसरण
11
तालिबानचा भेदभाव; काँग्रेसची सरकारवर टीका; महिला पत्रकारांना प्रवेश नाकारल्यावरून राजकारण
12
टाटा सन्सचे आयपीओ जारी व्हावे, टाटा ट्रस्टमधील काही विश्वस्तांचे मत; शापुरजी पालनजींकडून लिस्टिंगची पुन्हा मागणी 
13
‘डिजिटल सोने’ घेत नव्या युगात पाऊल टाका 
14
भारताने जगाला स्वतःची कहाणी प्रभावीपणे सांगावी, अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांचे आवाहन
15
सोनाली सेन गुप्ता आरबीआय कार्यकारी संचालकपदी 
16
 तालिबानचा पलटवार, अफगाणिस्तान-पाकिस्तान बॉर्डरवर भीषण संघर्ष, अनेक पोस्टवर कब्जा, ५ पाकिस्तानी सैनिकांचा मृत्यू 
17
मुंबईकरांचे कुटुंबकबिल्यासह सुट्टीच्या दिवशी मेट्रो पर्यटन, तिसऱ्या दिवशीही तुडुंब गर्दी, मुले उत्साही, मोठ्यांना अप्रूप
18
गाझा शांतता करारावर स्वाक्षरी करण्यास हमासचा नकार, ट्रम्प यांच्या प्रस्तावाची उडवली खिल्ली
19
भाजपा, JDUने आपल्या जागा मित्रपक्षांना दिल्या, तरी NDAमधील तिढा सुटेना, नाराज मांझी म्हणाले..      
20
भयानक! आधी प्रेयसीच्या वाढदिवसाचा केक कापला, मग त्याच चाकूने तिचा गळा चिरला

गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’ आता थेट पोलिसांच्या मोबाईलवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 01:05 IST

संजय पाटील कºहाड : गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी जेवढं अवघड, तेवढंच आरोपींचे ‘रेकॉर्ड’ मिळवणंही कठीण; पण आता आरोपींची ‘कुंडली’ ...

संजय पाटीलकºहाड : गुन्ह्यांची उकल करणे पोलिसांसाठी जेवढं अवघड, तेवढंच आरोपींचे ‘रेकॉर्ड’ मिळवणंही कठीण; पण आता आरोपींची ‘कुंडली’ थेट पोलिसांच्या मोबाईलवर उपलब्ध झाली आहे. एका ‘क्लिक’वर पोलीस देशभरातील कोणत्याही गुन्हेगाराचे रेकॉर्ड पाहू शकतात. एवढंच नव्हे तर त्याच्यावर न्यायालयात सुरू असलेल्या खटल्याची आणि तारखांची माहितीही पोलिसांना मोबाईलवरच मिळणार आहे.देशभरातील पोलीस दलासाठी ‘कोर्ट चेकर’ हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ सध्या उपलब्ध झालंय. पोलिसांना ते देण्यातही येतय. तसेच हे ‘अ‍ॅप’ कसे वापरायचे, याच्या कार्यशाळाही ‘व्हेरीफाय टष्ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ टीमचे मितेश कदम व त्यांचे सहकारी घेतायत. एखाद्या गुन्ह्यात परजिल्ह्यातील अथवा परराज्यातील आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले तर त्याचे पूर्वीचे गुन्हेगारी ‘रेकॉर्ड’ मिळविण्यात पोलिसांना अडचणी येत होत्या. न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असणाऱ्या ‘पब्लिक डोमेन’वर अथवा इतर संकेतस्थळ, सॉफ्टवेअरवर त्यांना अवलंबून राहावे लागत होते. ही माहिती तपासतानाही अनेक तांत्रिक अडचणींचा त्यांना सामना करावा लागत होता. त्यामुळे ही माहिती तत्काळ मिळविण्यासाठी आधुनिक पद्धती उपलब्ध व्हावी, अशी पोलिसांची मागणी होती.अखेर गुन्हेगारांची संपुर्ण माहिती असलेले ‘कोर्ट चेकर’ हे ‘अ‍ॅप्लिकेशन’ बनविण्यात आले आहे. यापूर्वी ‘टष्ट्वेंटी फोर बाय सेव्हन’ या संकेतस्थळाचा व ‘अ‍ॅप्लिकेशन’चा पोलीस दलाकडून वापर होत होता. मात्र, त्यामधीलच आधुनिक आवृत्ती असलेले ‘कोर्ट चेकर’ हे अ‍ॅप्लिकेशन उपलब्ध करण्यात आले आहे.कºहाडातील मितेश कदम यांच्यासह त्यांच्या टीमकडून सुरुवातीला सातारा जिल्ह्यात या अ‍ॅपबाबतच्या कार्यशाळा घेतल्या जातायत. यापुढे प्रत्येक पोलीस ठाण्यात अशी कार्यशाळा घेतली जाणार आहे.फक्त पोलीसच वापरू शकतात हे ‘अ‍ॅप’हे अ‍ॅप्लिकेशन बनविताना पोलीस महासंचालकांची परवानगी घेण्यात आली आहे. हे अ‍ॅप्लिकेशन मोबाईलवर ‘इन्स्टॉल’ करून घेतल्यानंतर त्या ‘डाऊनलोडर’ची खातरजमा केली जाते. संबंधित व्यक्ती पोलीस असली तरच त्या व्यक्तीला अ‍ॅप्लिकेशनमध्ये ‘साईन इन’ करता येणार आहे. आॅनलाईन व्हेरीफिकेशन झाल्याशिवाय ते अ‍ॅप वापरताच येणार नाही. त्यामुळे त्याचा दुरुपयोगही होणार नाही.फोटोवरूनही होणार ओळख‘कोर्ट चेकर’मध्ये सध्या आरोपीचे संपूर्ण नाव, पत्ता टाकला की त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी, रेकॉर्ड मिळते. मात्र, त्यामध्येही आधुनिकता आणून आरोपीचा फक्त फोटो टाकला तरी त्याची संपूर्ण ओळख, रेकॉर्ड मिळू शकेल, असे नवीन ‘फिचर’ या अ‍ॅपमध्ये उपलब्ध केले जाईल.