शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

साता-यात उदयनराजे आणि शिवेंद्रराजेविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2017 10:32 IST

आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुची' बंगल्याजवळ झालेल्या मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीनंतर शुक्रवारी सकाळी दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, पोलिसांनीही स्वतः पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली असून परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री झालेला गोळीबार पोलिसांनी केला नाही, असे सांगितले गेल्यामुळे आता हा गोळीबार नेमका कुणाच्या कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरू झाला आहे.

ठळक मुद्देगोळीबार करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध सुरू 'जलमंदिर' अन् 'सुरूची' परिसरात धुमश्चक्रीनंतर सन्नाटा !साताऱ्यात कडक पोलीस बंदोबस्त; रस्त्यावर वाहनांच्या काचांचा सडा

सातारा - आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या 'सुरुची' बंगल्याजवळ झालेल्या मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीनंतर शुक्रवारी(6 ऑक्टोबर) सकाळी उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रसिंहराजे भोसले या दोन्ही राजेंच्या गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान पोलिसांनीही स्वतः पुढाकार घेऊन या दोन्ही गटांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाची स्वतंत्र फिर्याद दाखल केली असून परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

दरम्यान, गुरुवारी मध्यरात्री झालेला गोळीबार पोलिसांनी केला नाही, असे सांगितले गेल्यामुळे आता हा गोळीबार नेमका कुणाच्या  कार्यकर्त्याने केला, याचा शोध सुरू झाला आहे. विशेष म्हणजे, शाहूपुरीकडून येणारा रस्ताही पोलिसांनी बंद केला आहे.  मध्यरात्रीच्या राड्यानंतर खासदार उदयनराजे शेकडो समर्थकांसह शहर पोलीस ठाण्यात दाखल झाले होते. या ठिकाणी पोलीस अधीक्षक संदीप पाटील व इतर पोलीस अधिकारी यांच्यासोबत सुमारे एक तासभर उदयनराजेंची चर्चा झाली.

त्यानंतर उदयनराजे गटाच्या समर्थकांची फिर्याद नोंदवून घेऊन शाहूपुरी पोलीस ठाण्याकडे पाठवून देण्यात आली. उदयनराजे गटातर्फे अजिंक्य मोहिते यांनी ही फिर्याद दिली. दरम्यान, आमदार शिवेंद्रसिंहराजे यांच्या गटातर्फेही विक्रम पवार यांनी उदयनराजे गटाविरुद्ध गुन्हा दाखल केला. एकमेकांविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या दोन्ही फिर्यादीत उदयनराजे आणि शिवेंद्रराजे या दोघांचीही नावे आहेत. सध्या 'सुरुची' बंगल्याजवळ प्रचंड पोलीस बंदोबस्त असला तरी या भागात अजूनही तणावाचे वातावरण आहे.

या परिसरातील वाहतूक बंद करण्यात आली असली तरी या ठिकाणी पडलेला काचांचा सडा पाहण्यासाठी सर्वसामान्य नागरिक घाबरून डोकावत होते. दरम्यान, मध्यरात्रीच्या धुमश्चक्रीत जखमी झालेले पोलीस अधिकारी किशोर धुमाळ यांच्यावर उपचार करण्यात आले. अशा अवस्थेतही धुमाळ हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दोन्ही बाजूच्या फिर्यादी दाखल करून घेण्यात मग्न होते. दरम्यान रात्री घटनास्थळी गोळीबाराच्या फैरी पोलिसांनी झाडलेल्या नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे या ठिकाणी नेमका कोणत्या कार्यकर्त्यांने गोळीबार केला, याचाही शोध सुरू झाला आहे.