सातारा : मास्कचा वापर न करता आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी १२ जणांवर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गुरसाळे, ता. खटाव येथे गुरसाळे-गोपुज मार्गावर दीपक उत्तम येवले (वय ५३, रा. मेडद, ता. माळशिरस), बाळाजी बापू निंबाळकर (वय १८, रा. सदाशिवनगर), नीलेश उत्तम जंजे (वय २१), भारत दिनकर हिंगे (वय ६५), शिवाजी रामचंद्र तुपे (वय ६२), धनाजी रघुनाथ लवटे, विठ्ठल चंदू तुपे, रज्जाक अब्दुल शेख (वय ४४), युवराज भीमा जंजे, नामदेव अंकुश पवार (सर्व रा. मेडद, ता. माळशिरस) व अन्य एकाने कोरोना संसर्ग सुरू असतानाही मास्कचा वापर केला नाही. त्यांनी स्वत:ची व अन्य नागरिकांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली नाही.