शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
4
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
5
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
6
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
7
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
8
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
9
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
10
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
11
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
12
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
13
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
14
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
15
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
16
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
17
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
18
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
19
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
20
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त गाडी घरात घुसली, पिंगळी खुर्दमध्ये थरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 12:24 IST

Accident Satara : सातारा-लातूर महामार्गावर अपघातग्रस्त वाहन रस्त्यालगतच्या घरात घुसल्याची घटना पिंगळी खुर्द (ता. माण) येथे घडली. रस्त्यामुळे धोकादायक बनलेल्या या घराजवळ अखेर अनर्थ घडलाच. अपघातावेळी घरात असलेल्या गौतम रणपिसे यांच्यासह कुटुंबीय बचावले. मात्र यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे.

ठळक मुद्दे अपघातग्रस्त गाडी घरात घुसली, पिंगळी खुर्दमध्ये थरार घरातील कुटुंबीय सुखरुप बचावले; घराचे मोठे नुकसान

म्हसवड : सातारा-लातूर महामार्गावर अपघातग्रस्त वाहन रस्त्यालगतच्या घरात घुसल्याची घटना पिंगळी खुर्द (ता. माण) येथे घडली. रस्त्यामुळे धोकादायक बनलेल्या या घराजवळ अखेर अनर्थ घडलाच. अपघातावेळी घरात असलेल्या गौतम रणपिसे यांच्यासह कुटुंबीय बचावले. मात्र यामध्ये घराचे मोठे नुकसान झाले आहे.महामार्गाच्या कामामुळे रस्ता रुंद झाला आहे. याशिवाय जमिनीपासून रस्त्याची उंची वाढल्याने पिंगळी खुर्द येथील कांबळे वस्तीजवळ घरांची उंची रस्त्याला समांतर झाली आहे. याठिकाणी संरक्षक कठडे नसल्याने धोका निर्माण झाला आहे. रात्रीच्या वेळी अंधारामुळे ही घरे दिसूनही येत नाहीत. परिणामी येथे मोठा अनर्थ घडण्याची भीती व्यक्त होत होतीच. या रस्त्यावरील पहिल्याच अपघाताने ही भीती येथील रणपिसे कुटुंबीयांनी अनुभवली आणि सर्वांच्याच मनाचा थरकाप उडाला.व्हॅन आणि छोटा हत्ती यांच्यात हा अपघात झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या छोटा हत्ती वाहनाने अचानक वळण घेत असतानाच साताऱ्याकडून येणाऱ्या व्हॅनला जोरदार धडक दिली. या धडकेच्या आवाजाने रणपिसे कुटुंबाने घराबाहेर धाव घेतली. याच दरम्यान व्हॅन गाडी थेट घराला जाऊन धडकली. याच वेळी प्रसंगावधान राखत रणपिसे कुटुंबीय सुखरूप सुरक्षित जागी पळाल्याने बचावले. मात्र वाहनाच्या धडकेमुळे घराचा बहुतांशी भाग कोसळून मोठे नुकसान झाले.गौतम रणपिसे यांची परिस्थिती खूप हलाखीची असून महामार्गाच्या कामपूर्वीच त्यांनी घरकुल योजनेतून घर व शौचालयाचे बांधकाम पूर्ण केले होते.अपघातामुळे मात्र आता हे कुटुंब उघड्यावर आले आहे.

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर