शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

शाहूपुरीत नागरिकांच्या गाड्यांसह बेडूक उड्या सुरूच, डबक्यांच्या हंगामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2019 17:21 IST

पावसाळा सुरू झाला की वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाहूपुरी ग्रामस्थ रस्त्यावरून प्रवास करत असतात. रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी आणि रस्त्याशेजारून जाणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या बेडूक उड्या मारत असल्याचे विचित्र चित्र शाहूपुरीत पाहायला मिळत आहे. कारण शाहूपुरीत आता खड्ड्यांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.

ठळक मुद्देडबक्यांच्या हंगामाला सुरुवात : यंदाही रस्त्याची चाळणतातडीने उपाययोजना करणे आवश्यक

सातारा : पावसाळा सुरू झाला की वाहतुकीचे सर्व नियम धाब्यावर बसवून शाहूपुरी ग्रामस्थ रस्त्यावरून प्रवास करत असतात. रस्त्याच्या मधून चालणारे पादचारी आणि रस्त्याशेजारून जाणाऱ्या वाहनचालकांच्या गाड्या बेडूक उड्या मारत असल्याचे विचित्र चित्र शाहूपुरीत पाहायला मिळत आहे. कारण शाहूपुरीत आता खड्ड्यांच्या हंगामाला सुरुवात झाली आहे.वाहतुकीचे नियम सर्वांनाच सारखे असे म्हणतात. वाहनचालकाने गाडी रस्त्याच्या कोणत्या दिशेने चालवावी आणि पादचाऱ्यांनी कुठून चालावे? याचे संकेत ठरलेले आहेत. याची पायमल्ली करणाऱ्यांना शासन दरबारी दंडही भरावा लागतो; पण पावसाळा सुरू झाला की शाहूपुरी ग्रामस्थांवर नेमकं या पावसातच वाहतुकीचे सर्व नियम बाजूला ठेवून खड्डे चुकवत रस्त्यावरून जाण्याची वेळ आली आहे.शहराचे उपनगर म्हणून शाहूपुरीचा विशेष परिचय आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शाहूपुरीमध्ये राहणाऱ्यांची संख्याही झपाट्याने वाढत आहे. वाढत्या शहरीकरणाचा विस्तार शाहूपुरीच्या दिशेने होत असल्याने शहराचे महत्त्वपूर्ण अंग म्हणून या परिसराकडे पाहिले जाते. मात्र, त्या मानाने नागरी सुविधांचा अभाव रस्त्यांकडे पाहिले असता जाणवतो.

शाहूपुरीच्या स्थापनेपासून तेथील रस्त्यांवर विविध माध्यमांतून विनोद झाले आहेत. वाढलेल्या लोकसंख्येच्या तुलनेत येथील स्थानिकांची रस्त्यांबाबत घोर निराशाच झाली आहे. पाऊस आला धावून रस्ता गेला वाहून ही गत गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ अनुभवत आहेत.शाहूपुरीत राहणाऱ्या अनेकांना नोकरी, बाजारपेठ, शाळा, व्यवसाय, कॉलेज या कारणांसाठी दिवसातून किमान एक-दोनदा शहरात यावे लागते. तसेच शाहूपुरीला जोडून अनेक ग्रामीण भागाला हाच रस्ता जोडला गेला आहे, त्यामुळे या रस्त्यावर सतत वर्दळ असते.या वर्दळीवर नियंत्रण आणून वाहतुकीचे काही नियम लागू होण्याची चिन्हे नाहीतच; पण पावसाळ्यातील या रस्त्यावरील प्रवास धोकादायक ठरू पाहत आहे.

रस्त्यावर साठलेल्या खड्ड्यांतील पाण्यातून मार्ग काढताना वाहनचालकांची दमछाक होत आहे. तर वाहनांमुळे खड्ड्यांतील पाणी अंगावर उडू नये, यासाठी पादचाऱ्यांची कसरत सुरू असते. शाहूपुरीवासीयांना या बेडूक उड्यांपासून वाचविण्यासाठी नव्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा या रस्त्यावरून प्रवास करणाºयांकडून व्यक्त होत आहे.

टॅग्स :road safetyरस्ते सुरक्षाSatara areaसातारा परिसर