शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

गायीसाठी पाळीव कुत्र्याने दिला जीव!

By admin | Updated: July 29, 2016 23:21 IST

बिबट्याचा हल्ला : चोरांबे शिवारात ग्रामस्थ भयभीत; बंदोबस्त करण्याची मागणी

मेढा : मेढा शहरापासून अवघ्या दोन किलोमीटरवर असलेल्या मेढा-महाबळेश्वर मार्गावर चोरांबे गावाच्या हद्दीत गुरुवारी सायंकाळी बिबट्याने गायीचा पाठलाग केला. यावेळी एका कुत्र्याने बिबट्याचा प्रतिकार केला. त्यामुळे बिबट्याने कुत्र्यावर हल्ला करून ठार मारले. यामुळे चोरांबे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत माहिती अशी की, तुषार सपकाळ यांच्या घरातील गायी चोरांबे गावाच्या डोंगरालगत असलेल्या खडक नावाच्या क्षेत्रात चरायला सोडल्या होत्या. गायींना रानात चरायला सोडून तुषार सपकाळ घरी आले. सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान गायी गावाकडे पळत आल्या. गायी पळत आल्या म्हणून गावातील लोकांना संशय आल्याने तुषार सपकाळ व त्यांचा चुलत भाऊ हे दोघे रानाकडे गेले असता गायींबरोबर असणारे कुत्रे दिसले नाही. त्यावेळी खडक रान असलेल्या ठिकाणापासून डोंगराकडे रक्त सांडल्याचे दिसले. त्यानंतर रात्री साडेआठपर्यंत परिसरात शोध घेतला असता कुत्रे फरफटत नेल्याच्या व बिबट्याच्या पायांचे ठसे आढळले. रात्री दहाच्या सुमारास चोरांबे गावचे नागरिक, युवक या डोंगर परिसरात गेले. त्यांनी फटाके लावून बिबट्याला हुसकावण्याचा प्रयत्न केला. बॅटऱ्यांच्या साह्याने शोध घेतला असता एका जाळीत बिबट्याचे डोळे चमकल्याचे दिसले. बिबट्याबरोबर आण्ाखी एक बिबट्या असल्याचे जाणवले. यावेळी फटाके वाजवून, बॅटरीचा झोत मारून, आरडाओरड करूनही ते जागचे हालले नसल्याचे सपकाळ यांनी सांगितले. (प्रतिनिधी)म्हणे, माणूस मेलातरच तक्रार घेतो...कुत्रे बिबट्याने मारल्याचे आढळल्यानंतर सरपंचांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना फोन लावला. उपस्थित कर्मचाऱ्यांनी ‘ बिबट्याने माणूस मारला असेल तरच आम्ही तक्रार घेतो,’ असे उत्तर दिले. यामुळे ग्रामस्थांत संतापाची लाट पसरली आहे.