जिल्हाधिकारी शेखर सिंह म्हणाले, गेले वर्षभर लॉकडाऊनच्या काळात आम्ही जे निर्णय घेतले, त्यास लोकांनी अडचणीत असतानाही मोठे सहकार्य केले. त्यामुळे लोकांचे आभार मानले पाहिजेत. जत्रा, यात्रा वर्षभर बंद आहेत. तरीही लोकांनी समजून घेतले.
पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल म्हणाले, दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आनंदराव पाटील यांनी कोविड किट वाटपाचा घेतलेला कार्यक्रम महत्त्वाचा आहे. यामुळे कोरोना लढ्याला बळ मिळेल. गेले वर्षभर लोकांनी धैर्य बाळगले आहे.
डॉ. अतुल भोसले म्हणाले, दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर आनंदराव पाटील यांनी ग्रामपंचायती, कोविड योद्ध्यांना पाठबळ दिले आहे. जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक व अधिकारी वर्गाने गेले वर्षभर चांगले काम करत जिल्हावासीयांचे रक्षण केले आहे. कृष्णा परिवारातर्फे दुसऱ्या टप्प्यातही प्रशासनाला आवश्यक ती मदत करण्यात येईल.
आनंदराव पाटील म्हणाले, सामाजिक बांधिलकी व शेवटच्या माणसापर्यंत निधीचा उपयोग व्हावा, यासाठी हा उपक्रम राबविला आहे.
फोटो
विजयनगर, ता. कराड येथे कोरोना किटचे वितरण करताना जिल्हाधिकारी शेखर सिंह, यावेळी आनंदराव पाटील डाॅ. अतुल भोसले आदी उपस्थित होते.