शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
4
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
5
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
6
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
7
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
8
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
9
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
10
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
11
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
12
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
13
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
14
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
15
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
16
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
17
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
18
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
19
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
20
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
Daily Top 2Weekly Top 5

धारदार शस्त्राने वार करून चुलत्याचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 13:11 IST

घरगुती भांडणाचा राग डोक्यात ठेवून धारदार सुरीने गळ्यावर वार करून चुलत्याचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री खटाव तालुक्यातील कुकुडवाड येथे घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

ठळक मुद्देधारदार शस्त्राने वार करून चुलत्याचा खूनपूर्वीच्या भांडणाचा राग डोक्यात ठेवून कुकुडवाडमध्ये कृत्य

कुकुडवाड : घरगुती भांडणाचा राग डोक्यात ठेवून धारदार सुरीने गळ्यावर वार करून चुलत्याचा खून करण्यात आला. ही खळबळजनक घटना सोमवारी मध्यरात्री खटाव तालुक्यातील कुकुडवाड येथे घडली. घटनेनंतर हल्लेखोर फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.घटनास्थळ व पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, माण तालुक्यातील कुकुडवाड (कारंडेवाडी) येथील संदीप ऊर्फ पप्पू वसंत चव्हाण (वय २६) हा युवक दारू पिऊन घरात सतत भांडण करत होता. चार दिवसांपूर्वी संदीपची चुलता लक्ष्मण अण्णासाहेब चव्हाण (वय ५०) यांच्यामध्ये पूर्वीच्या वादातून भांडण झाले होते.

चुलते लक्ष्मण चव्हाण हे सोमवारी रात्री घराच्या बाहेर झोपले असताना जुन्या भांडणाचा राग मनात धरून संदीप याने दारूच्या नशेत चुलत्याच्या गळ्यावर धारदार सुरीने वार केले. जखम खोलवर जाऊन रक्तस्त्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. आरोपी संदीप चव्हाण याने घटनास्थळावरून पळ काढला असून, सध्या फरार आहे.खुनाची माहिती म्हसवड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन आरोपीस शिवारात शोध घेतला. घटनेचा पंचनामा करून संदीप चव्हाण याच्या विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे तपास करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर