शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

मतमोजणी केंद्राला सुरक्षेचे कडे! ‘अभिनव’ बंदोबस्त : अतिउत्साही कार्यकर्त्यांवर करडी नजर

By admin | Updated: May 15, 2014 23:37 IST

सातारा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेषत: उत्साही कार्यकर्त्यांवर

 सातारा : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी मतमोजणी केंद्रावर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून विशेषत: उत्साही कार्यकर्त्यांवर पोलिसांची करडी नजर राहाणार आहे. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अभिनव देखमुख यांनी केले आहे. शुक्रवार दि. १६ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या जळगाव, ता. कोरेगाव येथील गोडावूनमध्ये मतमोजणी होणार आहे. जिल्हा पोलीस दलाच्यावतीने या मतमोजणीसाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. त्यामध्ये १ अप्पर पोलीस अधीक्षक, २ पोलीस उपअधीक्षक, ५ पोलीस निरीक्षक, १४ सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उप निरीक्षक, १७४ पोलीस कर्मचारी यांच्यासह केंद्रीय राखीव बलाची १ तुकडी (प्लाटुन), राज्य राखीव पोलीस बलाची १ तुकडी (प्लाटुन) असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. याशिवाय आणिबाणीच्या काळात तत्काळ उपलब्ध होणारे मनुष्यबळ म्हणुन पोलीस मुख्यालयील २ पोलीस अधिकारी यांच्या अधिपत्याखाली २ स्ट्रायकिंग फोर्स, शीघ्र कृती दलाची पथके सतर्क राहाणार आहे. मतमोजणी केंद्रापासुन १०० मिटर परिसरात फौजदारी प्रक्रिया संहितेचे कलम १४४ तसेच संपूर्ण सातारा जिल्ह्यात मुंबई पोलीस अधिनियम १९५१ चे कलम ३७(१)(३) प्रमाणे प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आला आहे. मतमोजणी केंद्रापासून सुरक्षित अंतरावर चार चाकी तसेच दुचाकी वाहन तळाची स्वतंत्रपणे सोय करण्यात आली आहे. मतमोजणीचे निकाल ऐकण्यासाठी येणार्‍या व्यक्तींसाठी मतमोजणी केंद्रापासुन ३०० मिटर अंतरावर थांबण्याची सोय केलेली आहे. शुक्रवारी सकाळी ६ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत भिवडी ते जळगावकडे जाणारी वाहतूक ही भिवडीकडून जळगावकडे जाण्यासाठी एकेरी राहील. या एकेरी मार्गावरुन येणारी वाहने जळगाव ता. कोरेगाव येथून उजवीकडे वळून कोरेगाव मार्गे सातारा बाजुकडे अथवा डावीकडे वळून सातारारोड-वडूथ मार्गे साताराकडे येतील. या एकेरी मार्गावरुन ट्रक, ट्रॅक्टर अथवा कोणत्याही प्रकारच्या जड वाहनास प्रवेश बंद राहील. या नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई करण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)