शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus : जिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 12:43 IST

सातारा जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाचा उद्रेक अधिकच वाढला असून, रविवारी रात्री कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी गेला तर दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता २८ झाला. तर बाधितांची संख्या ६३१ वर पोहोचली आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यात आणखी दोघांचा कोरोनामुळे बळी१० नवे पॉझिटिव्ह; बळींचा आकडा २८ तर बाधितांचा ६३१

सातारा : जिल्ह्यात लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून कोरोनाचा उद्रेक अधिकच वाढला असून, रविवारी रात्री कोरोनामुळे आणखी दोघांचा बळी गेला तर दहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. यामुळे जिल्ह्यात बळींचा आकडा आता २८ झाला. तर बाधितांची संख्या ६३१ वर पोहोचली आहे.जिल्ह्यात गत पंधरा दिवसांत कोरोनाचे तब्बल १२८ रुग्ण वाढले आहेत. महिनाभरापूर्वीच्या तुलनेत जून महिन्यामध्ये बाधित रुग्णांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन चिंतेत पडले आहे. रविवारी रात्री जिल्ह्यातील दोघांचा कोरोनामुळे मृत्यू झाला तर दहा नागरिकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले.

खंडाळा तालुक्यातील आसवली येथील ५० वर्षीय पुरुष तर मुंबई येथून प्रवास करुन आलेल्या वाई तालुक्यातील पसरणी येथील ७५ वर्षीय पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या दोघांचेही मृत्यू पश्चात अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यातील आसवलीच्या ५० वर्षीय पुरुषाला सारीचा आजार होता. जिल्ह्यात बळींची संख्या आता २८ वर पोहोचली आहे.बाधित रुग्णांमध्ये वाई तालुक्यातील सोमेश्वरवाडी येथील ६८ वर्षीय महिला. खटाव तालुक्यातील पाचवड येथील ३० वर्षीय पुरुष व विसापूर येथील ७१ व ६२ वर्षीय पुरुष, जावळी तालुक्यातील काळोशी येथील ३९ वर्षीय महिला व प्रभुचीवाडी येथील २९ व २६ वर्षीय पुरुष तसेच ५० वर्षीय महिलेचा समावेश आहे. दरम्यान, पुणे येथू १८१ जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर